राजस्थानमध्ये गुर्जरांचे आरक्षणासाठी आंदोलन; मुंबई-दिल्ली रेल्वेसेवा पाडली बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 10:25 PM2019-02-08T22:25:47+5:302019-02-08T22:28:38+5:30
आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक कर्नल किरोडी सिंह बैसला यांनी गुर्जर समाजासह रायका, बंजारा, गाडि़या लोहार आणि रेवारी समाजाला पाच टक्के आरक्षण देण्य़ाची मागणी केली. यासाठी त्यांनी सरकारला 20 दिवसांची वेळ दिली होती.
जयपूर : राजस्थानमध्ये गुर्जर समाजाने पाच टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी सायंकाळी जोरदार आंदोलन केले. यावेळी संतप्त नागरिकांनी मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर कब्जा करत वाहतूक बंद पाडली. तसेच जयपूरसह अन्य शहरांमध्ये रस्ते बंद केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आरक्षण मिळत नाही तोवर रेल्वे आणि रस्ते वाहतूक बंद ठेवण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. राजस्थान सरकारने पोलिस दल तैनात केले असून इंटरनेट सेवाही ठप्प केली आहे. या आंदोलनामुळे पश्चिम मध्य रेल्वेने 4 ट्रेन रद्द केल्या असून 7 ट्रेन अन्य मार्गे वळविल्या आहेत.
रेल्वेमार्गावर रेल्वे खात्याने रेल्वे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले आहे. सवाई माधवपूर जिल्ह्यातील मलारना डुंगर भागात शुक्रवारी गुर्जर समाजाने महापंचायत बोलावली होती. आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक कर्नल किरोडी सिंह बैसला यांनी गुर्जर समाजासह रायका, बंजारा, गाडि़या लोहार आणि रेवारी समाजाला पाच टक्के आरक्षण देण्य़ाची मागणी केली. यासाठी त्यांनी सरकारला 20 दिवसांची वेळ दिली होती.
CPRO West Central Railway (WCR): 4 trains cancelled, 7 trains diverted following reservation movement by members of Gujjar community between Sawai Madhopur & Bayana railway stations in Rajasthan pic.twitter.com/CSguDfc0rg
— ANI (@ANI) February 8, 2019
शुक्रवारी ही मुदत संपली असून आता आरक्षण मिळाल्याशिवाय रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरु न करण्य़ाचा निर्णय आज घेण्य़ात आला. यानुसार या समाजाने रेल्वे मार्गावर ताबा मिळविला होता. जवळपास अर्धा तास रेल्वेसेवा ठप्प झाली होती.