Agneepath: बिहारमध्ये दोन कोचिंग क्लासेसची चौकशी, हिंसाचारप्रकरणी सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 09:06 AM2022-06-20T09:06:12+5:302022-06-20T09:06:58+5:30
Agneepath Protest: बिहारमध्ये अग्निपथ योजनेला विरोध करत झालेल्या आंदोलनात शनिवारी मसौढीच्या तारेगना रेल्वे स्टेशनला जाळण्यात आले होते. या लोकांना पकडण्यासाठी पोलीस आता धाडी टाकत आहेत.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये अग्निपथ योजनेला विरोध करत झालेल्या आंदोलनात शनिवारी मसौढीच्या तारेगना रेल्वे स्टेशनला जाळण्यात आले होते. या लोकांना पकडण्यासाठी पोलीस आता धाडी टाकत आहेत. दरम्यान, पाटणाचे जिल्हाधिकारी डॉ. चंद्रशेखर सिंह यांनी असा दावा केला आहे की, मसौढीच्या दोन कोचिंग क्लासेसनी हिंसाचार भडकविला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत
आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या क्लासेसमध्ये मसौढी, पालीगंज, मनेर आणि पाटणा येथील काही कोचिंग संस्थेचे नाव पुढे आले आहे. त्यांची ओळख निश्चित केली जात आहे.
एडीजी संजय सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांसोबत समाजातील काही अपप्रवृत्ती आहेत. या हालचालींवर आयबी आणि स्पेशल ब्रँचचे लक्ष आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हिंसाचार करणाऱ्यांची ओळख निश्चित केली.
जात आहे.