अग्निपथ योजनेची घोषणा! सैन्यात 4 वर्षे नोकरी, 6.9 लाखांचे पॅकेज; नंतर सेवा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 01:10 PM2022-06-14T13:10:50+5:302022-06-14T13:24:53+5:30
Agnipath Recruitment Scheme: तरुणांची सैन्यात चार वर्षांसाठी भरती केली जाणार. हे जवान नाही तर अग्नीवीर संबोधले जाणार. या दरम्यान अग्निवीरांना आकर्षक पगार मिळेल.
मोदी सरकारने पुढील दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा केल्यानंतर लगेचच अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. यानुसार तरुणांना देशसेवेची संधी मिळणार आहे. सैन्यात चार वर्षे नोकरी केल्यानंतर या तरुणांना सेवा निधी देखील दिला जाणार आहे.
तरुणांची सैन्यात चार वर्षांसाठी भरती केली जाणार. हे जवान नाही तर अग्नीवीर संबोधले जाणार. या दरम्यान अग्निवीरांना आकर्षक पगार मिळेल. चार वर्षांच्या सैन्य सेवेनंतर तरुणांना भविष्यासाठी अधिक संधी दिली जाणार आहे. सेवा निधी पॅकेज चार वर्षांच्या सेवेनंतर उपलब्ध होईल. या योजनेंतर्गत भरती झालेल्या बहुतांश सैनिकांना चार वर्षांनी मुक्त केले जाईल. मात्र, काही जवान आपली नोकरी सुरू ठेवू शकतील. 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना संधी मिळेल. प्रशिक्षण 10 आठवडे ते 6 महिन्यांचे असेल. या अग्नीवीरसाठी 10/12वीचे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. अग्निवीरांच्या ५० हजार जागा भरण्यात येणार आहेत.
संरक्षण मंत्रालयानुसार अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात आलेल्या तरुणांना पहिल्या वर्षी 4.76 लाखांचे पॅकेज मिळेल. चौथ्या वर्षी हे पॅकेज 6.92 लाखांवर जाईल. याशिवाय अन्य रिस्क आणि हार्डशिप भत्ते देखील दिले जातील. चार वर्षांनंतर सैन्य दल सोडावे लागणाऱ्या अग्निवीरांना 11.7 लाख रुपए सेवा निधी दिला जाईल, यावर कोणताही कर लावला जाणार नाही.
Delhi | The Cabinet Committee on Security has taken a historic decision today to approve the transformative scheme of 'Agnipath'. Under this, Indian youth would be granted an opportunity to get inducted into the Armed services: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/eUv2SyQBPw
— ANI (@ANI) June 14, 2022
तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी काही महिन्यांपूर्वीच याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपविला होता. याअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. चार वर्षांनंतर बहुतांश जवानांना सेवेतून मुक्त करण्यात येणार आहे. या जवानांना पुढे नोकरीसाठी खासगी कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे. यासाठी सैन्य दल मदत करणार आहे.
On completion of 4 years, agniveers will get an opportunity to apply voluntarily for regular cadre. Based on merit, org requirement, up to 25% shall be selected from that batch: Lt Gen Anil Puri, Additional Secretary, Dept of Military Affairs pic.twitter.com/pU9W2It9gx
— ANI (@ANI) June 14, 2022
जे अग्निवीर कुशल आणि सक्षम असतील त्यांना पुढे सैन्यात नोकरीवर ठेवले जाणार आहे. परंतू हा आकडा २५ टक्केच असेल. या प्रकल्पामुळे लष्कराचीही कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकते. कमी लोकांना पेन्शन द्यावी लागेल, तर दुसरीकडे पगारातही बचत होईल.