Agnipath: 'अग्निपथ' हिंसाचार; रेल्वेचे हजारो कोटींची संपत्ती स्वाहा; कोट्यवधींचा रिफंडही द्यावा लागला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:01 PM2022-06-22T12:01:56+5:302022-06-22T12:02:23+5:30

Agnipath Violence: अग्निपथ विरोधातील हिंसाचारात सूमारे 1000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

Agneepath violence; Thousands of crores of railway assets gone; Billions had to be refunded | Agnipath: 'अग्निपथ' हिंसाचार; रेल्वेचे हजारो कोटींची संपत्ती स्वाहा; कोट्यवधींचा रिफंडही द्यावा लागला...

Agnipath: 'अग्निपथ' हिंसाचार; रेल्वेचे हजारो कोटींची संपत्ती स्वाहा; कोट्यवधींचा रिफंडही द्यावा लागला...

googlenewsNext

Agnipath Voilence Damage to Railways: सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेला देशभरातून विरोध होत आहे. हजारो तरुण रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात तीव्र निदर्शने करत आहेत. यादरम्यान अनेक रेल्वे गाड्या आणि खासगी वाहने जाळण्यात आली. यामुळे भारतीय रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वेचे किती आणि कोणते नुकसान झाले
अग्निपथ विरोधातील हिंसाचारात 1000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच गाड्या जाळल्याने रेल्वेचे मोठे नुकसान झाले, त्यात गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे कोट्यवधी रुपये परत करावे लागले. या निदर्शनादरम्यान एकूण 922 मेल एक्सप्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या तर 120 गाड्या अंशतः रद्द कराव्या लागल्या.

कोट्यवधीचा रिफंड
प्रत्येक ट्रेनमध्ये सरासरी 1200-1500 प्रवासी प्रवास करतात, त्यामुळे सुमारे 1044 गाड्या रद्द झाल्यामुळे 12 लाख लोकांच्या प्रवासावर परिणाम झाला. देशात 5 लाखांहून अधिक पीएनआर रद्द करण्यात आले आणि सुमारे 1.5 लाख प्रवाशांना मध्येच ट्रेन सोडावी लागली. एका अंदाजानुसार, रेल्वेने 70 कोटी रुपये रिफंड केले आहेत.

रेल्वे खर्च (प्रति ट्रेन)
अग्निपथ योजनेच्या विरोधात देशात एवढे हिंसक आंदोलन झाले की, वेगवेगळ्या राज्यात 21 गाड्या जाळल्या आणि त्यामुळे रेल्वेचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत, जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो, तर मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सहसा 24 डबे असतात. इंजिनची किंमत 12 कोटी, एसी कोच 2.5 कोटी आणि स्लीपर कोच सुमारे 2 कोटी रुपये आहे. एका ट्रेनसाठी रेल्वेला सुमारे 30 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च येतो.

भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. रेल्वेकडून दररोज हजारो गाड्या चालवल्या जातात. सर्वसामान्यांच्या जीवनाची ती जीवनरेखा मानली जाते. रेल्वे रद्द झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही काळापासून देशाच्या अनेक भागांत सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात प्रचंड विरोध होत आहे. निदर्शनादरम्यान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा इत्यादी अनेक राज्यांमध्ये बदमाशांनी ट्रेनच्या बोगी पेटवल्या.

Web Title: Agneepath violence; Thousands of crores of railway assets gone; Billions had to be refunded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.