अग्नी-5 ची चाचणी यशस्वी, चीन-पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा; किती घातक आहे 'हे' क्षेपणास्त्र?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 08:42 PM2022-12-15T20:42:54+5:302022-12-15T20:43:51+5:30
Agni 5 Nuclear : क्षेपणास्त्रची लांबी 17.5 मीटर लांब आणि व्यास 2 मीटर आहे.
नवी दिल्ली : भारताने गुरुवारी अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. आता हे क्षेपणास्त्र रात्रीही हल्ला करू शकते. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र 5 हजार किमीपेक्षा जास्त अंतरावरील शत्रूंना नष्ट करू शकते.
विशेष म्हणजे, या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये पाकिस्तान आणि चीन येत आहेत, त्याचप्रमाणे रशिया, युक्रेन आणि इंडोनेशिया सारखे देशही त्याच्या रेंजमध्ये आहेत. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे बनवले आहे. या क्षेपणास्त्राचे वजन 50 हजार किलो आहे. माहितीनुसार, क्षेपणास्त्रची लांबी 17.5 मीटर लांब आणि व्यास 2 मीटर आहे.
India today successfully carried out the night trials of the Agni-5 nuclear-capable ballistic missile which can hit targets beyond 5,000 kms: Defence sources pic.twitter.com/AniA4Xgzdy
— ANI (@ANI) December 15, 2022
1500 किलो अण्वस्त्र वाहून नेऊ शकते
अग्नि-5 क्षेपणास्त्रामध्ये 1500 किलो वजनाची अण्वस्त्रे बसवता लावू शकतात. यामध्ये जे रॉकेट बूस्टर आहे, ते तीन स्टेजवर बसवण्यात आले आहे. तो ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट अधिक वेगवान आहे. ते एका सेकंदात 8.16 किमी अंतर कापते.