मोठी घडामोड! लष्करात येत्या दोन भरती सुरू; हिंसाचारातील उमेदवारांचे काय होणार..?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 01:36 PM2022-06-17T13:36:09+5:302022-06-17T19:05:48+5:30

Agnipath Protests: केंद्र सरकारच्या नवीन अग्पिनथ योजनेला देशभरात विरोध होत आहे. यातच आता पुढील शुक्रवारपासून भती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

Agnipath Protests:'Agneepath' recruitment starts from June 24; What will happen to the candidates in violence ..? | मोठी घडामोड! लष्करात येत्या दोन भरती सुरू; हिंसाचारातील उमेदवारांचे काय होणार..?

मोठी घडामोड! लष्करात येत्या दोन भरती सुरू; हिंसाचारातील उमेदवारांचे काय होणार..?

Next

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला देशभरात विरोध होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, या योजनेबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की, लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. 2022 मध्ये अग्निपथ योजनेंतर्गत वयोमर्यादा 21 वरून 23 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत लष्करातील भरती सुरू होणार आहे, तर पुढच्या शुक्रवारपासून म्हणजेच 24 जूनपासून नौदलातील भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.

जनरल पांडे म्हणाले की, या वर्षी या योजनेतील वयोमर्यादा दोन वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. यावेळी लष्करप्रमुखांनी तरुणांना 'अग्निवार' म्हणून भारतीय सैन्यात सामील होण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. लष्करप्रमुखांनी एका निवेदनात म्हटले आहे की, वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णयामुळे आमच्या अनेक उत्साही आणि देशभक्त तरुणांना संधी मिळेल. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. 

नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार म्हणाले...
नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार यांनी अग्निपथ योजनेचे वर्णन परिवर्तनाची योजना असल्याचे केले. ते म्हणाले की, आम्ही पूर्वीपेक्षा तीनपट किंवा चार पट अधिक भरती करू शकतो. अग्निपथ योजनेतील अग्निवीरांचे व्यक्तिमत्त्व विकसित होऊ शकते. देशात राष्ट्रवादी विचार रुजवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे हरी कुमार यांनी सांगितले. 

ट्रेन जाळणाऱ्यांनी सैन्यभरतीचा मार्ग बंद केला
सरकारच्या या योजनेविरोधात बिहारपासून तेलंगणापर्यंत हिंसक आंदोल होत आहे. दरम्यान, आता काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सैन्य म्हणजे शिस्त आणि अशा कृतीने तरुण स्वतः या शर्यतीतून बाहेर पडत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

संरक्षण विशेषज्ञ मेजर जनरल (निवृत्त) जीडी बक्षी
जीडी बक्षी म्हणाले की, 'मी तरुणांना आवाहन करू इच्छितो की, आम्ही शिस्तबद्ध लोकांना सैन्यात घेतो. तुम्हीच तुमचा मार्ग बंद करत आहात. अशा दंगलीत अडकलात, पोलिस केस होतील, मग सैन्यात भरती होण्याचा मार्ग बंद होईल. रेल्वे मालमत्तेचे नुकसान करू नका. आंदोलन करायचे असेल तर शांततेच्या मार्गाने करा, एक जुना सैनिक म्हणून तुम्हा सर्वांना आवाहन आहे.'

मेजर जनरल (निवृत्त) संजय सोई
'ही योजना खूप चांगली आहे. यातून तरुणांना संधी मिळत आहे. तरुणांनी सैन्यात सेवा करावी, जेणेकरून त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत होईल. सीमेचा अनुभव मिळाल्यानंतर नोकरीच्या शक्यता खूप जास्त आहेत. खाजगी सुरक्षा उद्योगातही संधी उपलब्ध होतील. तेथे पेमेंटही चांगले मिळेल. ज्या पद्धतीने दंगल झाली, त्यावरून कट असण्याची शक्यता दिसत आहे. ते तपासले पाहिजे.'

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.पी. मलिक
'दोन वर्षांपूर्वी सैन्य भरती पुढे ढकलण्यात आली तेव्हा अनेक तरुणांनी निवड चाचणी दिली. अग्निपथ योजनेसाठी काहींचे वय जास्त झाले असावे. ही निराशा समजण्यासारखी आहे. चार दिवसांपूर्वी ही योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यावर काही निवृत्त अधिकारी आणि राजकारणी जोरदार टीका करत आहेत. या योजनेबद्दल तरुणांना पटवून देण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी सरकार आणि सशस्त्र दलांनी मोठा पुढाकार घेतला पाहिजे.'

Web Title: Agnipath Protests:'Agneepath' recruitment starts from June 24; What will happen to the candidates in violence ..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.