Agniveer Female Bharti 2022: आता मुलीही होणार 'अग्निवीर', 40 हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 12:42 PM2022-12-09T12:42:36+5:302022-12-09T12:43:23+5:30

भारतीय नौदलात अग्निवीर भरतीमध्ये महिला उमेदवारांना 20 टक्के आरक्षण दिले जात आहे.

Agniveer Female Bharti 2022 Girls age between 17.5 years to 21 years can be eligible for this recruitment, Salary up to 40 thousand Know the all process | Agniveer Female Bharti 2022: आता मुलीही होणार 'अग्निवीर', 40 हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Agniveer Female Bharti 2022: आता मुलीही होणार 'अग्निवीर', 40 हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Next

नवी दिल्ली : भारतीय नौदलात अग्निवीर भरतीमध्ये महिला उमेदवारांना 20 टक्के आरक्षण दिले जात आहे. आताच्या घडीला भारतीय नौदलात 550 महिला विविध पदांवर कार्यरत आहेत. मात्र आता महिला उमेदवारांना अग्निनीवर भरतीच्या माध्यमातून देखील रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. 

हे उमेदवार ठरतील पात्र 

  • - जी महिला उमेदवार अग्निवीर भरतीमध्ये भाग घेत आहे तिचे वय 17.5 वर्षे ते 21 वर्षे यादरम्यान असावे. 
  • - ती उमेदवार 10वी पास असून अविवाहित असणे गरजेचे आहे.
  • - उमेदवाराची उंची 152 इंच म्हणजेच 4 फूट 11 इंच असावी.

खरं तर या भरतीमध्ये मुलींना उंचीमध्ये काही प्रमाणात सूट देखील देण्यात आली आहे, ज्याची माहिची भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. 

निवड प्रक्रिया
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल. 

कशावर आधारित असणार प्रश्न? 
या परीक्षेत ऑबजेक्टिव्ह प्रश्न विचारले जातील. जे 30 मिनिटांत सोडवावे लागतील. यामध्ये गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान या संबंधित प्रश्न असतील, ज्याचा अभ्यासक्रम आणि नमुना पेपर भारतीय नौदलाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

अशी होणार शारिरीक चाचणी
लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अग्निवीर मुलींना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल त्यांना 1.6 किलोमीटर धावणे 8 मिनिटांत पूर्ण करावे लागेल आणि 15 सिट-अप आणि 10 सिट-अप देखील करावे लागतील. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आयएनएस चिल्का येथे होणाऱ्या वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर त्यांची अंतिम निवड केली जाईल. 

पगार आणि सुविधा 
भारतीय नौदलात नोकरी मिळाल्याच्या पहिल्या वर्षी महिला अग्निवीरांना दरमहा 30 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. यानंतर दुसऱ्या वर्षी दरमहा 40 हजार रुपये, तिसऱ्या वर्षी दरमहा 36 हजार 500 रुपये आणि चौथ्या वर्षी दरमहा 40 हजार रुपये दिले जातील. या भरतीशी संबंधित अधिक माहिती भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Agniveer Female Bharti 2022 Girls age between 17.5 years to 21 years can be eligible for this recruitment, Salary up to 40 thousand Know the all process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.