सरकार 'अग्निवीर' योजनेत बदल करणार? राजनाथ सिंह यांचे मोठे विधान; काय म्हणाले पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 03:40 PM2024-03-28T15:40:16+5:302024-03-28T15:40:36+5:30
मोदी सरकारने 14 जून 2022 रोजी 'अग्नवीर' योजना आणली. या योजने अंर्गत तरुणांना भारतीय सैन्यात चार वर्षांसाठी सेवा देता येते.
Agniveer Recruitment Scheme :केंद्र सरकारने 14 जून 2022 मध्ये 'अग्निवीर' (Agniveer) योजना आणली. या योजने अंतर्गत देशातील तरुणांना 4 वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाते. पण, या योजनेला विरोधी पक्षांसह देशातील तरुणांनी जोरदार विरोध केला. आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी या अग्निवीर योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'गरज भासल्यास सरकार अग्निवीर योजनेत बदल करण्यास तयार आहे,' असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.
"Government open to change in Agniveer scheme if needed": Rajnath Singh
— ANI Digital (@ani_digital) March 28, 2024
Read @ANI Story | https://t.co/UK2mS3e5tz#rajnathsingh#agniveerscheme#Defencepic.twitter.com/SJAF68lG5h
तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्याचे सरकारचे प्रयत्न
टाईम्स नाऊच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संरक्षण दलात तरुणांची गरज आहे. तरुण अधिक उत्साही असतात, ते तंत्रज्ञानाचे अधिक जाणकार आहेत. त्यांचे भविष्य सुरक्षित राहील, याची आम्ही योग्य ती काळजी घेतली आहे. गरज भासल्यास आम्ही या योजनेत बदल करण्यास तयार आहोत.
काय आहे अग्निवीर योजना?
मोदी सरकारने 14 जून 2022 रोजी भारतीय सैन्यात तरुणांना भरती करण्यासाठी अग्नीवीर योजना सुरू केली. या योजने अंतर्गत चार वर्षांच्या कालावधीसाठी तरुणांना सैन्यात सेवा देता येते. या अग्निवीरांना निवृत्तीनंतर इतर माजी सैनिकांप्रमाणे पेन्शन, ग्रॅच्युईटी, आरोग्य योजना, माजी सैनिकाचा दर्जा मिळणार नाही. मात्र, निवृत्तीनंतर इतर ठिकाणच्या नोकरभरतीत त्यांना प्राधान्य दिले जाईल. ही योजना सुरू झाल्यापासून सातत्याने विरोधक यावर टीका करत आहेत.