Agniveer : अग्निवीरांसाठी खुशखबर! BSF-CISF मध्ये मिळणार १० टक्के आरक्षण, वय, फिजिकल टेस्टमध्येही सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 12:28 PM2023-03-17T12:28:49+5:302023-03-17T12:32:10+5:30
Agniveer : अग्निवीरमधून लष्करात भरती झालेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.
Agniveer : अग्निवीरमधून लष्करात भरती झालेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बीएसएफनंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरतीसाठी १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात नोटीस जारी केली आहे. केंद्रीय सरक्षा दल अधिनियम १९६८ नुसार नियमांमध्ये संशोधनानंतर ही नोटीफीकेशन जारी केली.
अग्निवीरांना निमलष्करी दलात सामावून घेण्याचा गृह मंत्रालयाचा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे माजी अग्निवीरांना निवृत्तीच्या वयापर्यंत रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे.
सरकारने यापूर्वी या नोकरीत दिलेल्या लाभांनुसार, यापैकी जास्तीत जास्त २५ टक्के अग्निवीरांना नंतर कायमस्वरूपी होण्याची संधी दिली जाईल. म्हणजे ४ पैकी एका अग्निवीरला कायमस्वरूपी नोकरी मिळेल. सैन्यात ४ वर्षानंतर परतलेले तरुण इतरांपेक्षा नोकरीसाठी अधिक पात्र असतील.
गृह मंत्रालय ४ वर्षांनंतर CAPF आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देईल. बड्या कंपन्यांनी अग्निवीरांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. अग्निवीरांसाठी ४ वर्षात पदवी अभ्यासक्रम असेल. ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रमाला भारतात आणि परदेशात मान्यता मिळेल.
BSF आणि CISF मधील वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. उच्च वयोमर्यादा माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचसाठी पाच वर्षे आणि इतर बॅचसाठी तीन वर्षांनी शिथिल केली आहे, योजनेंतर्गत २१ वर्षांच्या वरच्या वयोमर्यादेतही सशस्त्र दलात सामील होणार्यांना पहिल्या बॅचच्या बाबतीत लष्कर किंवा हवाई दल किंवा नौदलात चार वर्षांच्या सेवेनंतर वयाच्या ३० वर्षापर्यंत CISF द्वारे भरती करता येते. त्यानंतरच्या बॅचसाठी ते २८ वर्षांपर्यंत आहे.
बीएसएफ आणि सीआयएसएफमधील शारीरिक चाचणीतून सूट देण्यात येणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, माजी अग्निशमन जवानांना दोन्ही दलांमध्ये भरतीसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट देण्यात आली आहे. ११.७२ लाखांहून अधिकचा सेवानिवृत्ती निधी अग्निवीर वयाच्या २१ ते २४ व्या वर्षी निवृत्त होईल. मात्र त्यांना सरकारकडून ११,७२,१६० रुपये मिळतील. यामध्ये कोणताही आयकर लागणार नाही. म्हणजेच हा रिटायरमेंट फंड असणार आहे. यात अर्धी रक्कम अग्निवीरांची आणिअर्धी सरकार देणार आहे.