आग्र्यात विजय मिळवून गाेड पेठा कोण खाणार?; १९९१ चा अपवाद वगळता भाजपाचाच विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 10:33 AM2024-04-27T10:33:56+5:302024-04-27T10:34:23+5:30
समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी या दोघांनी स्वतंत्र उमेदवार दलित समाजाचा देऊन भाजपचा मार्ग सोपा केला आहे.
ललित झांबरे
आग्रा : ताजमहालच्या शहराला जातीय समीकरणात उत्तर भारतातील दलितांची राजधानी मानले जात असले, तरी लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ नेहमीच भारतीय जनता पक्षाला साथ देताना दिसून आला आहे. १९९१ पासून केवळ राज बब्बर यांचा अपवाद वगळता येथील खासदार भाजपचाच राहिला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल ही मालिका पुढे चालू ठेवतील, अशी अपेक्षा आहे.
समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी या दोघांनी स्वतंत्र उमेदवार दलित समाजाचा देऊन भाजपचा मार्ग सोपा केला आहे. या मतदारसंघात २५ टक्के लोकसंख्या दलित समुदायाची आहे. सपाचे उमेदवार सुरेशचंद्र कर्दम व बसपाच्या उमेदवार पूजा अमरोही हे दोघे जातव समुदायाचे आहेत. त्यात कर्दम हे आधी बसपामध्ये होते. त्यामुळे ते बसपाची मते विभाजित करतील, असे मानले जात आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
मोदी-योगी फॅक्टर, केंद्र व राज्य सरकारांनी केलेली विकासकामे आणि कायदा व सुव्यवस्थेची सुधारलेली स्थिती आपल्याला यश देईल, असा भाजप उमेदवाराला विश्वास आहे. कर्दम हे जातव व मुस्लिम समुदायाची मते मोठ्या प्रमाणावर घेतील, असे मानले जात आहे. ते बसपाची किती मते घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. पूजा अमरोही यांचा उच्चशिक्षित चेहरा, राजकीय वारसा आणि जातीय पार्श्वभूमी त्यांना दलितांची किती मते मिळवून देते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
सत्यपालसिंह बघेल
भाजप (विजयी)
६,४६,८७५
मनोजकुमार सोनी
(बसप)
४,३५,३२९