हृदयद्रावक! "मला माझा मुलगा हवाय..."; शहीद लेकाच्या गणवेशाला बिलगून आईचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 13:50 IST2023-12-05T13:49:44+5:302023-12-05T13:50:15+5:30
कॅप्टन शुभम गुप्ता यांचं सर्व सामान राजौरी युनिटमधून घरी पोहोचलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या मुलाची आठवण काढून आईला अश्रू अनावर झाले.

हृदयद्रावक! "मला माझा मुलगा हवाय..."; शहीद लेकाच्या गणवेशाला बिलगून आईचा टाहो
जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेले आग्रा येथील कॅप्टन शुभम गुप्ता यांचं सर्व सामान राजौरी युनिटमधून घरी पोहोचलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या मुलाची आठवण काढून आईला अश्रू अनावर झाले. आईने आपल्या शहीद मुलाचा गणवेश छातीशी कवटाळला आणि मग जोरजोरात रडू लागली. आईला रडताना पाहून घरात उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. कॅप्टन शुभम गुप्ता यांची आई फक्त "मला माझा मुलगा हवाय... त्याला का नाही आणलं?" असं म्हणत होती.
22 नोव्हेंबरला राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शुभम गुप्ता शहीद झाले होते. 12 दिवसांनंतर युनिटमधील लष्करी अधिकारी शुभम यांच्या शेवटच्या आठवणी घेऊन घरी पोहोचले. कॅप्टन शुभम गुप्ता यांनी वापरलेल्या वस्तू ट्रंकमध्ये सुरक्षित ठेवल्या होत्या. ज्यामध्ये गणवेश, कपडे, टोपी आणि इतर वस्तू होत्या. या गोष्टी पाहताच आईला रडू लागली
आपल्या शहीद मुलाच्या गणवेशाला बिलगली. माझा मुलगा कुठे आहे? असंच म्हणत होती. यावेळी लोकांनी तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला पण आईला अश्रू आवरले नाहीत. तर कॅप्टन शुभम गुप्ता यांचे वडील बसंत गुप्ता देखील स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे देखील डोळे पाणावले.
27 वर्षीय कॅप्टन शुभम गुप्ता यांची 2015 मध्ये आर्मीमध्ये निवड झाली होती. 22 नोव्हेंबर रोजी राजौरीतील धर्मसाल येथील बाजीमल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले होते. या चकमकीत आणखी चार जवान शहीद झाले. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांनाही ठार केलं.