शिवाजी महाराजांच्या नावे आता आग्र्यातील मुघल म्युझियम, भाजपानं सेनेला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 01:47 PM2020-09-15T13:47:21+5:302020-09-15T13:47:38+5:30

योगी सरकारच्या या निर्णयाचे छत्रपती शिवाजी वंशज आणि राज्यसभेचे खासदार संभाजी छत्रपती यांनी कौतुक केले आहे.

agra museum renamed chhatrapati shivaji reactions congress yogi government | शिवाजी महाराजांच्या नावे आता आग्र्यातील मुघल म्युझियम, भाजपानं सेनेला घेरलं

शिवाजी महाराजांच्या नावे आता आग्र्यातील मुघल म्युझियम, भाजपानं सेनेला घेरलं

Next

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने सोमवारी आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलले आहे. आता हे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय म्हणून ओळखले जाणार आहे. या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. योगी सरकारच्या या निर्णयाचे छत्रपती शिवाजी वंशज आणि राज्यसभेचे खासदार संभाजी छत्रपती यांनी कौतुक केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राज्यसभेचे खासदार संभाजी छत्रपती यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक म्हणून मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो.

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस बीएल संतोष यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करण्याचा हा योग्य मार्ग आहे. मुख्यमंत्री योगी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने एक संग्रहालयाचे नाव ठेवले आहे, तर काही लोक त्यांच्या वारशाचा दावा करणारे साधू, महिला, पत्रकार आणि दिग्गजांवर अत्याचार करतात.
यासंदर्भात कॉंग्रेस नेते दीपक सिंह म्हणाले की, उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार नाव बदलण्यासाठी नव्हे तर काम बदलण्यासाठी आले होते. भारतीय जनता पार्टी सरकार ज्या महापुरुषांची नावं घेते, जर त्यांनी त्यांचं अनुसरण केलं असतं तर भाजपाचे पाप कमी झाले असते.
सोमवारी या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले. सीएम योगी यांनी लिहिले की, आग्र्यामध्ये निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाईल. आपल्या नवीन उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या चिन्हांना स्थान नाही. आमचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिंद जय भारत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत यांनीही योगी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले. मराठा हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात चर्चेत आहे. दरम्यान, योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Web Title: agra museum renamed chhatrapati shivaji reactions congress yogi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.