Agra Road Accident: तरुणाचा अपघातात मृत्यू; मृतदेहाला शेकडो गाड्यांनी चिरडलं, हाडंही रस्त्याला चिकटून बसली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 07:28 PM2023-01-02T19:28:04+5:302023-01-02T19:28:51+5:30

Agra Road Accident: थंडीच्या दिवसात दाट धुक्यामुळे अनेक अपघात होतात. आग्र्यात याच धुक्यामुळे भीषण अपघात झाला.

Agra Road Accident: Youth dies in accident; body was crushed by hundreds of cars, the bones also stuck to the road | Agra Road Accident: तरुणाचा अपघातात मृत्यू; मृतदेहाला शेकडो गाड्यांनी चिरडलं, हाडंही रस्त्याला चिकटून बसली...

Agra Road Accident: तरुणाचा अपघातात मृत्यू; मृतदेहाला शेकडो गाड्यांनी चिरडलं, हाडंही रस्त्याला चिकटून बसली...

Next

Agra Road Accident: थंडीच्या दिवसात दाट धुक्यामुळे अनेकदा अपघात होतात. दरवर्षी याच धुक्यामुळे शेकडो रस्ते अपघात होतात आणि यात अनेकांचा मृत्यू होतो. उत्तर प्रदेशातील आग्र्यात याच दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला आहे. एका तरुणाचा यात मृत्यू झाला, पण त्याच्या मृत्यूनंतर जे घडलं, त्याने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. 

धक्कादायक घटना! 23 वर्षीय तरुणीला कारने उडवलं अन् 4KM फरफटत नेलं; जागीच मृत्यू

आग्रा हायवेवर दाट धुक्यामुळे चालकांना रस्त्यावर पडलेला तरुणाचा मृतदेह दिसलाच नाही. यामुळे रात्रभर शेकडो गाड्या त्या मृतदेहाला चिरडत गेल्या. यामुळे तो मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यावर विखुरला गेला. त्या तरुणाची हाडंही रस्त्याला चिकटून गेली. रस्त्यावर सर्वत्र रक्तच रक्त दिसत होतं. सोमवारी सकाळी धुकं हटल्यावर लोकांनी रस्त्यावरील भयावहः दृष्य पाहिलं. यानंतर पोलिसांना अपघाताबाबत माहिती देण्यात आली. 

मृतदेहाचे तुकडे गोळा करण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत करावी लागली. घटनास्थळावरील शर्टमुळे तरुणाची ओळख पडली. पोलिसांनी कसेबसे मृतदेहाची तुकडे गोळा करुन पोस्ट मॉर्टमला पाठवले. शर्टमध्ये पोलिसांना आधार कार्ड सापडले, ज्यावरुन तो तरुण मध्यप्रदेशचा रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे.

Web Title: Agra Road Accident: Youth dies in accident; body was crushed by hundreds of cars, the bones also stuck to the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.