शिवलिंगाच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाविरुद्ध याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 01:23 PM2023-05-19T13:23:09+5:302023-05-19T13:23:17+5:30
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीतर्फे उपस्थित ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांच्या निवेदनाची दखल घेतली आणि शुक्रवारी सुनावणीसाठी याचिका पटलावर घेण्याचे मान्य केले.
नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयानेवाराणसीच्याज्ञानवापी मशीद संकुलातील कथित शिवलिंगाचे वैज्ञानिक सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या मुस्लीम पक्षकारांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सहमती दर्शवली. या सर्वेक्षणात शिवलिंग किती जुने आहे हे ठरवण्यासाठी ‘कार्बन डेटिंग’ तंत्राचाही समावेश आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीतर्फे उपस्थित ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांच्या निवेदनाची दखल घेतली आणि शुक्रवारी सुनावणीसाठी याचिका पटलावर घेण्याचे मान्य केले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेले अपील प्रलंबित आहे, असे अहमदी म्हणाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ मे रोजी ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या वास्तूचे वय निश्चित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आदेश दिले होते, ज्यावर ‘शिवलिंग’ असल्याचा दावा केला जात आहे.
मे २०२२ मध्ये ज्ञानवापी मशीद संकुलात केलेल्या सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या संरचनेच्या कार्बन डेटिंगसह वैज्ञानिक चाचण्यांची मागणी करणारी याचिका फेटाळून लावणारा वाराणसी कोर्टाचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला होता.
कायद्यानुसार कार्यवाही
‘शिवलिंगा’चे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याच्या हिंदू पक्षाच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांना कायद्यानुसार कार्यवाही करून तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आदेश दिले होते.