सपकाळ नॉलेज हब आणि पोर्तुगाल विद्यापीठ यांच्यात करार

By Admin | Published: July 24, 2016 01:05 AM2016-07-24T01:05:10+5:302016-07-24T01:39:26+5:30

नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हब अंजनेरी, या शैक्षणिक संस्थेमध्ये (सीइएसपीयू) या पोर्तुगाल विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र पदवी या विषयाच्या शिक्षण शाखेच्या अभ्यासवर्गाची सुरुवात होणार आहे. अशा प्रकारचा भारतातील शिक्षण क्षेत्रातील पहिला करार सपकाळ नॉलेज हब व सीइएसपीयू पोर्तुगाल विद्यापीठ यांच्यात शुक्रवारी (दि.२२) झाला.

Agreement between Sakpal Knowledge Hub and Portugal University | सपकाळ नॉलेज हब आणि पोर्तुगाल विद्यापीठ यांच्यात करार

सपकाळ नॉलेज हब आणि पोर्तुगाल विद्यापीठ यांच्यात करार

googlenewsNext

नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हब अंजनेरी, या शैक्षणिक संस्थेमध्ये (सीइएसपीयू) या पोर्तुगाल विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र पदवी या विषयाच्या शिक्षण शाखेच्या अभ्यासवर्गाची सुरुवात होणार आहे. अशा प्रकारचा भारतातील शिक्षण क्षेत्रातील पहिला करार सपकाळ नॉलेज हब व सीइएसपीयू पोर्तुगाल विद्यापीठ यांच्यात शुक्रवारी (दि.२२) झाला.
सदर शैक्षणिक करारावरती प्रो. डोटर ए. अल्मेडा, अध्यक्ष सीईएसपीयू व सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन रवींद्र सपकाळ यांच्या स्वाक्षर्‍या झाल्या.
पोर्तुगीज विद्यापीठ हे ३० वर्षांपासून हेल्थ सायन्स ‘ा क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच सपकाळ नॉलेज हबमधील नावाजलेल्या औषधनिर्माणशास्त्र या महाविद्यालयाशी जोडले जात आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या सुवर्ण सहयोगामुळे औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील अभ्यासाच्या नवीन प्रयोगांना चालना मिळणार आहे व भारतातील या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. तसेच या करारामुळे भारतीय विद्यार्थी व शिक्षक यांचे युरोपियन देशात व युरोपियन विद्यार्थी व शिक्षक यांचे भारतात शिक्षणासाठी विचार विनिमय होणार आहे.
पोर्तुगीज विद्यापीठातर्फे सपकाळ नॉलेज हब औषधनिर्माणशास्त्र या महाविद्यालयाशी जोडले जात आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या सुवर्ण सहयोगामुळे औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील अभ्यासाच्या नवीन प्रयोगांना चालना मिळणार आहे व भारतातील या क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. तसेच या करारामुळे भारतीय विद्यार्थी व शिक्षक यांचे युरोपियन देशात व युरोपियन विद्यार्थी व शिक्षक यांचे भारतात शिक्षणासाठी विचार विनिमय होणार आहे.
पोर्तुगीज विद्यापीठातर्फे सपकाळ नॉलेज हब औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या पाहणी दरम्यान पाठविलेल्य दोन सभासदांच्या कमिटीमध्ये प्रो. लुईस व प्रो. हिथर या कमीटीने महावद्यिालयास भेट दिल्यानंतर सपकाळ नॉलेज हबमधील शैक्षणिक सोयी-सुविधा बघून संस्थेची प्रशंसा केली. या शैक्षणिक करारामुळे सपकाळ नॉलेज हब संस्थेमधील आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात अजून मोलाची भर पडली आहे. तसेच भारतातील फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सर्व युरोपियन देशांमध्ये सपकाळ नॉलेज हबद्वारे औषधनिर्माणशास्त्र शाखेची द्वारे खुली होणार आहेत.

Web Title: Agreement between Sakpal Knowledge Hub and Portugal University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.