Agriculture Budget 2020 : शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:04 PM2020-02-01T12:04:09+5:302020-02-01T12:29:56+5:30
Agriculture Budget 2020 : शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 16 कलमी विशेष कृती योजना जाहीर केली आहे.
नवी दिली - वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2020-21 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. यावेळी शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 16 कलमी विशेष कृती योजना जाहीर केली आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना विविध सोईसवलती पुरवण्याची घोषमा वित्तमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठीच्या योजनांसाठी 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मोठ्या घोषणा
- केंद्राच्या मॉडेल लॉला लागू करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहित करण्यात येईल
- पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या 100 जिल्ह्यात व्यापक प्रयत्न केले जातील
- पंतप्रधान कुसूम योजनेंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येईल
- 15 लाख शेतकऱ्यांना ग्रीड कनेक्टेड पंपसेटशी जोडून घेतले जाईल
- उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल, रासायनिक खतांचा वापर कमी केला जाईल, रासायनिक खतांच्या संतुलित वापरासाठी माहिती दिली जाईल
- देशात 162 दशलक्ष टन धान्य साठवण क्षमता आहे. आता नाबार्ड याला जीयोटॅग करेल. तसेच धान्य साठवणीसाठी गट आणि तालुका स्तरावर नवी कोठारे बांधली जातील. त्यासाठी राज्य सरकार जमीन देऊ शकते.
- महिलांसाठी धान्य लक्ष्मी योजनेची घोषणा, त्याअंतर्गत बीबियाण्याशी संबंधित योजनांमध्ये महिलांना सामावून घेतले जाईल, स्वयंसहायता गटांद्वारे गावाता साठवण भांडारे उभारली जातील
- दूध, मांस, मासे यांची साठवण आणि वाहतूक करण्यासाठी विशेष किसान रेल्वे धावणार
- शेतकऱ्यांसाठी कृषी उडाण योजना सुरू केली जाईल, ही विमानसेवा कृषिमंत्रालयाकडून दिली जाईल
- दूध उत्पादन दुप्पट करण्यासाठी सरकारकडून योजना चालवली जाईल, 2025 पर्यंत दुग्धउत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य
- 311 दशलक्ष टन उत्पादनासह बागायती उत्पादनात देश बराच पुढे गेला आहे. आता एक उत्पादन, एक जिल्हा योजनेस प्रोत्साहन देण्यात येईल
- एकीकृत कृषी मधुमाशी पालनास प्रोत्साहन देण्यात येईल
- नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, जैविक शेतीसाठी एक पोर्टल तयार केले जाईल, ऑनलाइन मार्केट मजबूत बनवले जाईल
- फायनान्सिंग ऑन निगोशिएबल वेअर हाऊसिंग स्कीम अधिक मजबूत केली जाईल
- किसान क्रेडिट कार्ड योजनेस 2021 पर्यंत मुदतवाढ
- देशातील शेतकऱ्यांना सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून, त्यासाठी नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाईल
- फूड अँड माऊख आजार तसेच पीपीआर आजारांचे 2025 पर्यंत उच्चाटन केले जाईल
- सागरी क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, पुढील आर्थिक वर्षांत मत्स्य उत्पादन 308 दशलक्ष टनपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य, 3077 सागर मित्र तयार केले जातील त्यातून किनारी भागातील तरुणांना रोजगार मिळेल
- दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत 58 लाख एसएचजी बनवण्यात आले आहे. त्यांना अधिक भक्कम केले जाईल.