"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 08:14 PM2022-09-25T20:14:19+5:302022-09-25T20:16:51+5:30

sudhakar singh : कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला सुधाकर सिंह यांनी संबोधित केले. 

agriculture minister sudhakar singh said officers of my department are corrupt,kaimur bihar | "माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान 

"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान 

googlenewsNext

कैमूर : बिहारमधील कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला संबोधित करताना कृषीमंत्री सुधाकर सिंह म्हणाले की, माझ्या विभागातील अधिकारी भ्रष्ट आहेत. 25 ते 50 हजार रुपयांची वसुली करतात. मात्र लवकरच सर्व अधिकारी ठीक होतील, असे बिहारचे कृषीमंत्री सुधाकर सिंह म्हणाले. कैमूर येथील भगवानपूर येथे आयोजित शेतकरी चर्चासत्राला त्यांनी संबोधित केले. 

यावेळी एका घटनेचा संदर्भ देत सुधाकर सिंह म्हणाले की, "मोजमाप अधिकारी रात्री दहा वाजता पेट्रोल पंपावर 10 लिटर तेल घेऊन गेले. पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केली असता, रजिस्टरवर लिहा, असे सांगितले. तक्रार प्राप्त होताच दखल घेत. त्या अधिकाऱ्याला आजपासून निलंबित करण्यात आले आहे. पण जेव्हा तो दिसेल तेव्हा तुम्ही त्याला बुटाने माराल. त्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या जागी एक प्रामाणिक अधिकारी येणार आहे."

आता अनुदानाचे पैसे बाजार समिती आणि मंडई बनवण्यासाठी खर्च होणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. तसेच, कैमूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त ब्लॉक अधौरा येथे चार मंडई बांधण्यात येणार आहेत. बियाणे महामंडळाकडून शेतकऱ्यांना बनावट बियाणे देण्यात आले आहे. बियाणे वेळेपूर्वी पेरले गेले आणि पिकाचा दर्जा खूपच खराब आहे. आठवडाभरात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सुधाकर सिंह म्हणाले.

गेल्या 17 वर्षांपासून ही व्यवस्था जीर्ण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या डझनभर योजना घेऊन येत आहे. शेतीशी संबंधित लोकांना रोजगार मिळेल. आता महिनाभरापासून हे काम सुरू आहे, मात्र या एका महिन्यात बिहारमधील 3000 खतांच्या दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत. या दुकानांमधून फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले होते,असे सुधाकर सिंह यांनी सांगितले.

वस्तुस्थिती अशी आहे की, माझ्या कार्यकाळात कोणत्याही खताच्या दुकानावर लाईन नव्हती. मी एक अॅप आणणार आहे, त्या अॅपवरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आणि ब्लॉकमधील खतांच्या दुकानात किती खत उपलब्ध आहे हे कळेल. शेतकऱ्यांशी निगडित मूलभूत समस्या तीन वर्षांत सोडवल्या जातील, असेही सुधाकर सिंह यांनी म्हणाले.

Web Title: agriculture minister sudhakar singh said officers of my department are corrupt,kaimur bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.