बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानालाही हिंसेचे गालबोट, भाजपा, टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 09:55 AM2019-05-12T09:55:48+5:302019-05-12T09:56:40+5:30
मतदानाच्या सहाव्या टप्प्यादरम्यानही बंगालमधील मतदानाला हिंसेचे गालबोट लागले आहे.
कोलकाता - तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होत असल्याने बंगालमधील लोकसभेच्या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मतदानाच्या सहाव्या टप्प्यादरम्यानही बंगालमधील मतदानाला हिंसेचे गालबोट लागले आहे. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी बंगालमधील झारग्राम येथे भाजपाच्या एका बूथ कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. तसेच मरधारा येथील कांठीमध्ये टीएमसीच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे.
बंगालमधील आठ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. मात्र मतदानापूर्वी येथे हिंसाचाराने डोके वर काढले आहे. बंगालमधील झारग्राम येथे भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. रामोन सिंह असे या मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी हत्येचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, अन्य दोन भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला.
West Bengal: BJP worker Raman Singh found dead last night in Gopiballabpur, Jhargram. More details awaited. pic.twitter.com/MVAdDUOrn0
— ANI (@ANI) May 12, 2019
दुसरीकडे मरधारा येथील कांठीमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्याच्या मृतदेह सापडला आहे. सुधाकर मैती असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याशिवाय मिदनापूर येथे तृणमूल काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार कऱण्यात आला आहे. तसेच बेल्दा येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला.
दरम्यान, बंगालमधील माजी आयपीएस अधिकारी आणि घाटल लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार भारती घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. केशपूर येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी गैरवर्तन केले, असा आरोप त्यांनी केला आहे.
West Bengal: Two BJP workers Ananta Guchait & Ranjit Maity shot at last night in Bhagabanpur, East Medinipur. Both the injured admitted to hospital. More details awaited.
— ANI (@ANI) May 12, 2019