विमानतळावर कर्मचाऱ्यांनी खेळला गरबा; प्रवाशांची जिंकली मने !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 12:41 PM2018-10-17T12:41:24+5:302018-10-17T12:41:58+5:30
अहमदाबाद विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी फ्लॅश मॉबच्या माध्यमातून गरबा खेळून उपस्थित प्रवाशांची मने जिंकली.
अहमदाबाद : देशभरात नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात दांडिया व गरब्याचे विशेष आकर्षण असते. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. येथील अहमदाबाद विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी फ्लॅश मॉबच्या माध्यमातून गरबा खेळून उपस्थित प्रवाशांची मने जिंकली.
गेल्या सोमवारी अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांनी गरबा खेळला. यावेळी त्यांनी हा गरबा फ्लॅश मॉबच्या माध्यमातून खेळला गेला. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. विशेष, म्हणजे, येथील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही टर्मिनल्सवर फ्लॅश मॉब गरबा खेळण्यात आला.
Garba inside terminal: Airline staffers at #SVPI airport perform Garba at international terminal to welcome passengers #Ahmedabad#Gujarat#aviation#Navratri2018@kumarmanish9pic.twitter.com/Cdp0w4HHyj
— Tanushree Bhatia (@tweettanushree) October 16, 2018
नवरात्रीत गरबा आणि दांडियासाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातमध्ये प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी हा चांगला मार्ग होता. काही प्रवासी बाहेर जाणारे होते आणि त्यांना येथील गरब्याची आठवण येईल. म्हणून विमानाची वाट पाहत असताना त्यांना काही स्टेप्स नाचायला लावणे, ही यामागील कल्पना होती. यासाठी एअरपोर्टस् अॅथॉरिटी ऑफ इंडिया आणि एअरलाईन्स ऑपरेटर कमिटीकडून परवानगी घेण्यात आली होती, असे येथील एका अधिकाऱ्याने सांगितले.