अहमदाबादमध्ये 9 जणांना चिरडणाऱ्या जग्वार चालकाला अटक; धडकेत 25-30 फूट दूर फेकले गेले होते लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 09:28 PM2023-07-20T21:28:53+5:302023-07-20T21:29:18+5:30

या अपघातापूर्वी, येथे दोन वाहनांची धडक झाल्याने लोक जमले होते. याच वेळी ही भरधाव कार लोकांमध्ये शिरली. संबंधित कार ताशी 100 किलोमीटर हूनही अधिक वेगात असावी, असे बोलले जात आहे.

Ahmedabad car crash Police arrest car driver Tathya Patel who crushed 9 people | अहमदाबादमध्ये 9 जणांना चिरडणाऱ्या जग्वार चालकाला अटक; धडकेत 25-30 फूट दूर फेकले गेले होते लोक

अहमदाबादमध्ये 9 जणांना चिरडणाऱ्या जग्वार चालकाला अटक; धडकेत 25-30 फूट दूर फेकले गेले होते लोक

googlenewsNext


गुजरातमधील अहमदाबाद येथे बुधवारी रात्री उशिरा (रात्री 1 वाजण्याच्या सुमारास) एका भरधाव जग्वार कारने 9 जणांना चिरडल्याची घटना घडली होती. येथील सरखेज-गांधीनगर महामार्गावरील इस्कॉन ब्रिजवर हा अपघात झाला होता. या अपघातापूर्वी, येथे दोन वाहनांची धडक झाल्याने लोक जमले होते. याच वेळी ही भरधाव कार लोकांमध्ये शिरली. संबंधित कार ताशी 100 किलोमीटर हूनही अधिक वेगात असावी, असे बोलले जात आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी कार चालक तथ्य पटेलला अटक केली आहे.


 
या अपघातात दोन पोलीस हवालदारांचाही मृत्यू झाल्याचे समजते. या कारने धडक दिल्यानंतर काही लोक हावेत उडून 25 ते 30 फूटांपर्यंत फेकले गेले. एकूण 9 मृतांपैकी दोन पोलिसांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे दोघेही वाहतूक पोलिसात तैनात होते. तसेच, जॅग्वार चालकासह 13 जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा व्हिडिओही आता समोर आला आहे. 

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. 

अपघाताचा व्हिडिओ -

 

Web Title: Ahmedabad car crash Police arrest car driver Tathya Patel who crushed 9 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.