Mucormycosis: धक्कादायक! लहान मुलांनाही ब्लॅक फंगचा धोका; गुजरातेत १३ वर्षीय मुलाला लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 05:24 PM2021-05-21T17:24:00+5:302021-05-21T17:31:04+5:30

Mucormycosis: आता लहान मुलांनाही या आजाराचा धोका असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ahmedabad hospital confirmed first case of mucormycosis black fungus in 13 year old boy | Mucormycosis: धक्कादायक! लहान मुलांनाही ब्लॅक फंगचा धोका; गुजरातेत १३ वर्षीय मुलाला लागण

Mucormycosis: धक्कादायक! लहान मुलांनाही ब्लॅक फंगचा धोका; गुजरातेत १३ वर्षीय मुलाला लागण

googlenewsNext
ठळक मुद्देलहान मुलांनाही ब्लॅक फंगचा धोकागुजरातेत १३ वर्षीय मुलाला लागणकेंद्राची नवी नियमावली लागू

अहमदाबाद: कोरोना संकटाचे देशभरात थैमान सुरू आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव अंशतः कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू अद्यापही चिंतेत भर टाकणारे ठरत आहेत. अशातच आता देशभरात म्युकरमायोसीस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराचा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये हा आजार बळावत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता लहान मुलांनाही या आजाराचा धोका असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, गुजरातमधील अहमदाबाद येथे एका १३ वर्षीय लहान मुलाला काळ्या बुरशीच्या आजाराने गाठल्याचे वृत्त आहे. (ahmedabad hospital confirmed first case of mucormycosis black fungus in 13 year old boy)

गुजरातमधील अहमदाबाद येथे १३ वर्षीय मुलाला ब्लॅक फंगस आजार झाल्याची माहिती मिळाली आहे. लहान मुलांमध्ये या आजाराचा हा पहिला रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. काळ्या बुरशीच्या आजाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर चांदखेडा येथील खुशबू चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात आले. 

ममता बॅनर्जी भवनीपूरमधून पोटनिवडणूक लढण्याच्या तयारीत? TMC आमदाराचा राजीनामा

कोरोनाची लागण 

या १३ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय या मुलाला कोणताही अन्य आजार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या मुलाच्या आईलाही कोरोना झाला होता. मात्र, आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशभरातील अनेक ठिकाणी या आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. काळ्या बुरशीच्या आजाराचे देशभरात ७ हजार २५१ रुग्ण आढळून आले आहेत. तेलंगण आणि राजस्थान या राज्यांमध्ये ब्लॅक फंगसला महामारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

इस्रायलचे PM नेतन्याहू यांच्यावर देशांतर्गत तीव्र नाराजी; हमाससमोर गुडघे टेकल्याची टीका

केंद्राची नवी नियमावली लागू

तुम्हा सर्वांना विनंती आहे की, म्युकरमायकोसीसचा समावेश साथरोग कायदा १८९७ अंतर्गत करण्यात यावा. यामध्ये सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्र, वैद्यकीय महाविद्यालये यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतील. यामध्ये रुग्णाची तपासणी, आजाराचे निदान आणि उपचार व्यवस्थापन यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर यांनी दिलेल्या सूचनांचेही पालन होईल. याशिवाय, म्युकरमायकोसीसचे संशयित आणि बाधित अशा रुग्णांची आकडेवारी आरोग्यविभागाला जिल्हानिहाय पुरवली जावी. यामध्ये जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचा समावेश असेल, असे आरोग्यमंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.  
 

Web Title: ahmedabad hospital confirmed first case of mucormycosis black fungus in 13 year old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.