Ahmedabad Fire : शाळेच्या इमारतीला भीषण आग, 4 विद्यार्थी अडकल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 01:23 PM2021-04-09T13:23:13+5:302021-04-09T13:24:04+5:30
Ahmedabad Fire : सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
नवी दिल्ली - अहमदाबादमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. कृष्णानगर परिसरातील एका शाळेत आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुर (Fire in Ahmedabad Ankur School) या शाळेत अचानक आग लागली. या आगीत 4 विद्यार्थी अडकल्याची भीती वर्तवण्य़ात येत आहे (4 Students Stuck in School). आगीची माहिती मिळताच अग्निशमंन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी (9 एप्रिल) अचानक अहमदाबादच्या अंकुर या शाळेत अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सध्या कोरोनाच्या संकटात शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. असं असताना शाळेत विद्यार्थी कसे आले आणि ते आगीमध्ये अडकले याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Ahmedabad: A fire that broke out at Ankur School in Krishna Nagar has been brought under control and cooling process is underway. No casualties reported. pic.twitter.com/iRov8LQ867
— ANI (@ANI) April 9, 2021
कोरोनाच्या संकटात "या" राज्याने घेतला मोठा निर्णय; पहिली ते आठवीची शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद
शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचलली जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं महागात पडू शकतं. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एका राज्याने मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा ही 15 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. मध्य प्रदेश सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य प्रदेशमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली होती. त्यामध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी शाळा न उघडण्याचे निर्देश दिले. तर 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा होणार असल्याचं सांगितलं आहे.
संतापजनक! फी वसुलीसाठी पालकांवर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकीhttps://t.co/4ZIMEg4aCv#CoronavirusIndia#schools#Students#Fee
— Lokmat (@MiLOKMAT) April 6, 2021
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मध्य प्रदेशच्या शिक्षण विभागाने 1 ली ते 8 वीपर्यंतची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. मध्य प्रदेश सरकारने बोर्डाच्या परीक्षांचा विचार करुन 18 डिसेंबरपासून 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार विद्यार्थी आपल्या पालकांचं संमतीपत्र सादर करुन शाळेत उपस्थित राहू शकत होते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मोठी दुर्घटना टळली! अर्धी ट्रेन जवळपास एक किलोमीटर पुढे निघून गेली... प्रवाशांमध्ये एकच गोंधळhttps://t.co/kY91RZVLNx#IndianRailways#TRAIN
— Lokmat (@MiLOKMAT) April 3, 2021