ऐ चुप्प... डिबेट शोमध्ये मराठमोळ्या डॉ. लेलेंकडून बाबा रामदेव यांची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:20 PM2021-05-25T12:20:32+5:302021-05-25T12:22:34+5:30

बाबा रामदेव यांच्या अॅलोपॅथीसंदर्भातील व्हिडिओनंतर आयोजित आज तकच्या डिबेट शोमध्ये डॉ. लेले जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांची बोलती बंद केली. डॉ. लेले अॅलोपॅथीसंदर्भात बोलत असताना बाबा रामदेव मध्ये-मध्ये बोलायचे

Ai chupp ... Dr. Lele in the debate show. Baba Ramdev stops talking by dr. suyesh lele | ऐ चुप्प... डिबेट शोमध्ये मराठमोळ्या डॉ. लेलेंकडून बाबा रामदेव यांची बोलती बंद

ऐ चुप्प... डिबेट शोमध्ये मराठमोळ्या डॉ. लेलेंकडून बाबा रामदेव यांची बोलती बंद

Next
ठळक मुद्देबाबा रामदेव यांच्या अॅलोपॅथीसंदर्भातील व्हिडिओनंतर आयोजित आज तकच्या डिबेट शोमध्ये डॉ. लेले जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांची बोलती बंद केली.

मुंबई - योग गुरु रामदेव बाबा  (Baba Ramdev)  यांनी पुन्हा डॉक्टरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी आरोग्य मंत्र्यांने झापताच रामदेव बाबांनी अॅलोपथीवरील वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले होते. मात्र, मी कोणतीही पदवी न घेता डॉक्टर बनलो, अॅलोपथीचे डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी कसे पडतात असा सवाल केला आहे. य़ावरुन आयोजित एका टीव्ही डिबेटमध्ये आयएमएच्या माजी अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांना रामदेव यांना चांगलाच फैलावर घेतलं. 

बाबा रामदेव यांच्या अॅलोपॅथीसंदर्भातील व्हिडिओनंतर आयोजित आज तकच्या डिबेट शोमध्ये डॉ. लेले जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांची बोलती बंद केली. डॉ. लेले अॅलोपॅथीसंदर्भात बोलत असताना बाबा रामदेव मध्ये-मध्ये बोलायचे. त्यावरुन, डॉ. लेले चांगलेच संतापले होते. ऐ चुप्प... चुप्प... असे म्हणत लेले यांनी रामदेव बाबांची बोलती बंद केली. त्यानंतर, बाबांनीही प्रतिक्रिया देत आप कौन है.. मुझे चुप बैठानेवाले असे म्हणत उत्तर दिले. मात्र, सोशल मीडियावर डॉ. लेले यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांना समर्थन मिळत आहे. तर, काहीजण डॉ. लेलेंना ट्रोलही करत आहे. पण, सोशल मीडियावर ते व्हायरल होत आहेत. 

कोण आहेत डॉ. जयेश लेले

डॉक्टर लेले हे मूळ महाराष्ट्रातील मुंबईचे असून सध्या जनपद येथे मेडीकल प्रॅक्टीस करत आहेत. लेले यांनी शेठ जीएस. मेडिकल कॉलेजमधून 1972 साली एमबीबीएसची पदवी घेतली असून सध्या ते इंडियन मेडिकल असोसिएशनेच सरचिटणीस आहेत. यापूर्वी महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. जयेश लेले हे बालरोगतज्ञ असून वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अनेकदा सन्मानित करण्यात आल आहे.  

डॉ. राजन शर्मांनीही बाबा रामदेव यांना सुनावले

रामदेव बाबा यांची एका टीव्ही डिबेटवेळी आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांच्यासोबत वाद झाला. अॅलोपथीकडे अनेक आजारांवर काहीच उपचार नाहीत. आय़ुर्वेदामध्ये बीपी, शुगर, थायरॉईडसारख्या आजारांवर उपचार आहेत. कोरोना लसीचे दोन डोस घेवूनही हजारावर डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेत, असे वक्तव्य रामदेव बाबांनी केले. यावर शर्मा यांनी कोविड सेंटरच्या लेव्हल ३ मध्ये धोतरावर जाऊन काम करून दाखवा, असे आव्हान दिले. यावर रामदेव बाबा भडकले, तुम्ही माझा कुर्ता, लंगोट काढू नका. स्वत:ला सर्व शक्तीमान समजू नका, असे बाबा रामदेव म्हणाले.  

बाबा रामदेव यांचे आयएमएला 25 प्रश्न

रामदेव बाबांनी यानंतर ट्विट करत आयएमएला २५ प्रश्न विचारले आहेत. अमेरिकेचे डॉक्टर बोलतात, डब्ल्यूएचओ म्हणते तेव्हा का नाही बोलत कोणी? मी जर डॉक्टरांचा आणि मेडिकल सायन्सचा सन्मान करतो, तर तुम्ही आयुर्वेदाचा सन्मान का करत नाही असा सवाल केला आहे. आयुर्वेदावर टीका करणे, शिव्या का दिल्या जातात. फार्मा कंपन्या खूप आहेत, मग डॉक्टर त्यांचे बळी का ठरत आहेत. डॉक्टर तर एका फार्मा कंपनीचा प्रतिनिधी नसतो, अशा शब्दांत रामदेव बाबांनी सवाल केले आहेत. 
 

Web Title: Ai chupp ... Dr. Lele in the debate show. Baba Ramdev stops talking by dr. suyesh lele

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.