'एआय' चष्मा बनणार दृष्टिहिनांचे डोळे, भारतीयाचा आविष्कार; तंत्रज्ञानाला पेटंट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:30 AM2024-12-04T10:30:05+5:302024-12-04T10:30:37+5:30
त्याच्या मदतीने दृष्टिहीनांना जग येईल. चष्म्यात जवळच्या मोबाइल क्रमांक सेव्ह केलेले असतील. संकटसमयी हा चष्मा त्यांना थेट मेसेज पाठवेल. त्यात संबंधित दृष्टिहीन व्यक्तीचे लोकेशनही असेल.
लखीमपूर : दृष्टी गेल्यामुळे अंधकारमय आयुष्य जगणाऱ्या नेत्रहीनांसाठी एक आशेचा किरण आहे. उत्तर प्रदेशातील एका टेकस्टार्टअपने 'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने एक चष्मा बनविला आहे. त्याच्या मदतीने दृष्टिहीनांना जग येईल. चष्म्यात जवळच्या मोबाइल क्रमांक सेव्ह केलेले असतील. संकटसमयी हा चष्मा त्यांना थेट मेसेज पाठवेल. त्यात संबंधित दृष्टिहीन व्यक्तीचे लोकेशनही असेल.
कॅडर टेक्नॉलॉजीस सर्व्हिसेस लिमिटेड असे या स्टार्टअपचे नाव असून, २८ वर्षीय मुनीर खान हे संस्थापक आहेत. या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. १६-१७ डिसेंबरला आयआयटी मुंबईमध्ये होणाऱ्या टेकफेस्टमध्ये या चष्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मुनीर खान हे हार्वर्ड विद्यापीठात सेंसर यंत्रणेवर संशोधन करीत आहेत. त्यांनी बनविलेल्या चष्याच्या प्रोटोटाईपला अमेरिकेच्या 'एफडीए'ने मंजुरी दिली आहे. (वृत्तसंस्था)
काय फायदा होणार?
'एआय' चष्मा वापरणाऱ्या दृष्टिहीनांना सर्वसामान्य वस्तूंची ओळख पटविणे, अडथळ्यांची जाणीव, चेहरा ओळखणे,औषध आणि अन्नामधील फरक समजणे इत्यादी गोष्टीमध्ये मदत होणार आहे. विशेष म्हणजे, हा चष्मा अडथळे ओळखून अलर्टदेखील देऊ शकतो.
कसा वापरायचा हा चष्मा?
■ १२ तासांपर्यंत चष्मा एकदा चार्ज केल्यानंतर काम करू शकेल.
■ दर ३-४ तासांनी आराम देण्यासाठी तो काढणे योग्य राहील.
■ १०० मीटरपर्यंत अंतरावरील वस्तू आणि व्यक्तींना चष्मा पाहू शकेल.