पैसे देऊन महिलांना दगडफेकीसाठी तयार करते आसिया, NIAनं केलं FIR दाखल

By admin | Published: June 7, 2017 07:33 AM2017-06-07T07:33:04+5:302017-06-07T07:33:04+5:30

काश्मीरमधील दगडफेक करणा-या तरुणांना फुटीरतावादी नेत्यांकडून पैसे पुरवले जात असल्याचं समोर आलं होतं.

AIA, NIA files FIR against women for money laundering | पैसे देऊन महिलांना दगडफेकीसाठी तयार करते आसिया, NIAनं केलं FIR दाखल

पैसे देऊन महिलांना दगडफेकीसाठी तयार करते आसिया, NIAनं केलं FIR दाखल

Next
>ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 7 - गेल्या काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील दगडफेक करणा-या तरुणांना फुटीरतावादी नेत्यांकडून पैसे पुरवले जात असल्याचं समोर आलं होतं. याच प्रकरणात NIAनं एफआयआर दाखल केलं आहे. FIRमध्ये हाफिज सईदसोबत महिला फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी हिचेसुद्धा नाव आहे.

आसिया पैसे देऊन महिलांना दगडफेकीसाठी तयार करत असल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणे(NIA)नं काश्मीर सतत धुमसतं ठेवणा-या हुर्रियत नेत्यांच्या निधीच्या प्रकरणात FIR दाखल केलं आहे. हुर्रियत नेत्यांना हाफिज सईद आणि इतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून काश्मीरमध्ये हिंसा पसरवणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे आणि सुरक्षा जवानांवर दगडफेक आणि स्कूल, सरकारी इमारतीचं नुकसान करण्यासाठी निधी दिला जातो, हे काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं.  

तत्पूर्वी दुख्तरान-ए-मिल्लत या फुटीरतावादी संघटनेची प्रमुख आसिया अंद्राबी हिला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटकही केली होती. काश्मीर खो-यातील महिलांना सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि येथील जनजीवन विस्कळीत करण्याच्या आरोपाखाली आसियाविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली होती. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अशांतता पसरवण्याच्या आरोपाखाली आसियाला अटक करण्यात आले होते. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकावल्याबद्दल आसिया विरोधात बेकायदा कृत्ये नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेण्यात आले होते.  2015मध्ये आसियानं आपल्या जम्मू येथील निवासस्थानी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्ताच्या स्वातंत्र्य दिन साजरा करत आपल्या समर्थकांसह पाकिस्तानी झेंडे फडकावले होते.
 
 

Web Title: AIA, NIA files FIR against women for money laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.