VIDEO : म्हणून राज्यसभेत ढसाढसा रडले हे खासदार महोदय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 03:53 PM2019-07-24T15:53:46+5:302019-07-24T15:55:07+5:30
आज राज्यसभेमध्ये कामकाज सुरू असताना अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण सभागृह भावूक झाले.
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मिरप्रश्नी मध्यस्थीच्या केलेल्या दाव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज जोरदार गोंधळ झाला. दरम्यान, राज्यसभेमध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण सभागृह भावूक झाले. त्याचे झाले असे की आज राज्यसभेमध्ये काही खासदारांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस होता. त्यानिमित्त देण्यात येणाऱ्या निरोपाच्या भाषणादरम्यान एआयएडीएमकेचे खासदार वासुदेवन मैत्रेयन गहिवरले आणि यांच्या डोळ्यात पाणी आले. आपले निधन झाल्यानंतर सभागृहाने शोक पाळू नये असेही, आवाहन त्यांनी केले. त्यामुळे सभागृहातील वातावरणही भावूक झाले.
एआयएडीएमकेचे खासदार वासुदेवन मैत्रेयन हे जेव्हा आपल्या निरोपाच्या भाषणासाठी उभे राहिले. तेव्हा त्यांनी आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर ते भावूक झाले आणि सभागृहामध्येच त्यांना रडू कोसळले. यादरम्यान, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच निकटचे मित्र अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी आभार मानले.
#WATCH Outgoing AIADMK MP V Maitreyan breaks down while giving farewell speech in Rajya Sabha; says, "At this juncture I place on record deep sense of gratitude towards my beloved leader, Amma (Jayalalithaa) for having immense faith in me & sending me to this House for 3 terms," pic.twitter.com/flFpqRqen4
— ANI (@ANI) July 24, 2019
'2009 मध्ये जेव्हा श्रीलंकेमध्ये अनेक तामिळी व्यक्तींची हत्या झाली त्यावेळी राज्यसभेत शोक व्यक्त करण्यात आला नव्हता. या प्रकारामुळे मला खूप दु:ख झाले होते. त्यामुळे जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा या सभागृहात माझ्या मृत्युबाबत शोकप्रस्ताव सादर करू नये, असे आवाहन मी सभागृहाला करतो,' असे त्यांनी सांगितले.
यावेळी मैत्रेयन यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले. तसेच विविध पक्षांच्या ज्येष्ठ खासदारांचेही आभार मानले. तसेच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचीही आठवण काढली. बुधवारी राज्यसभेतील एकूण पाच खासदारांचा शेवटचा दिवस होता. यामध्ये डी. राजा. व्ही मैत्रेयन, के. आर. अर्जुन, आर. लक्ष्मण, टी. रत्नवेल यांचा समावेश आहे.