एडस् ग्रस्ताचे ३०० महिलांशी संबंध

By admin | Published: October 22, 2015 04:01 AM2015-10-22T04:01:22+5:302015-10-22T04:01:22+5:30

सायबराबाद पोलिसांनी सोमवारी रात्री एका आॅटोचालकाला अटक केली तेव्हा त्याने दिलेल्या कबुलीने ते चक्रावूनच गेले. ‘डॉन जॉन’ हे चित्रपटातील व्यभिचारी पात्र आपल्या कस्टडीत आहे

Aid's relationship with 300 women | एडस् ग्रस्ताचे ३०० महिलांशी संबंध

एडस् ग्रस्ताचे ३०० महिलांशी संबंध

Next

हैदराबाद : सायबराबाद पोलिसांनी सोमवारी रात्री एका आॅटोचालकाला अटक केली तेव्हा त्याने दिलेल्या कबुलीने ते चक्रावूनच गेले. ‘डॉन जॉन’ हे चित्रपटातील व्यभिचारी पात्र आपल्या कस्टडीत आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. या आॅटोचालकाने स्वत:ला एडस् या जीवघेण्या आजाराची लागण झाल्याचे समजल्यानंतर सुमारे ३०० महिलांशी शरीरसंबंध ठेवत सूड उगवीत राहिला. या ३१ वर्षीय विकृत नराधमाने स्वत: हे धक्कादायक तथ्य उघड केले.
लैंगिक संबंध ठेवलेल्या महिलाही एडस्ग्रस्त होऊन मृत्यूच्या दारात जाव्यात या हेतूने त्याने व्यभिचाराची परिसीमा गाठली. तो जन्मला आंध्र प्रदेशमध्ये असला तरी त्याचे मूळ केरळमध्ये आहे. संशयास्पद वाहनांवर नजर ठेवून असलेल्या पोलिसांनी उप्पल येथे त्याचा आॅटो पकडला. त्याची चौकशी केली जात असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. (वृत्तसंस्था)

आठ महिन्यांपूर्वी कळले...
तो मीरजालगुडा येथे वास्तव्याला असून त्याने सुन्न करणारी सूडकथा सांगताच पोलिसांनाही धक्का बसला. त्याला आठ महिन्यांपूर्वी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती तपासणीतून मिळाली. त्यानंतर तो आपले दिवस भरले असे मानून कुकृत्य करीत सुटला.
त्याने तिसरे लग्न केले असून पहिल्या दोन पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत. त्याची तिसरी पत्नीही स्वतंत्र राहते. त्याला मूल-बाळ नसल्यामुळे कोणतीही कौटुंबिक जबाबदारी उरलेली नाही. एडस्मुळे मरायचेच आहे तर जीवघेणा सूड उगवून मरायचे असे ठरवून तो वेश्यागमन करण्यासह अन्य महिलांना जाळ्यात ओढत राहिला.

सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने
त्याच्याकडे १.२५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आढळून आले, अशी माहिती पोलीस ठाण्याचे अधिकारी वाय. नरसिंह रेड्डी यांनी दिली.

Web Title: Aid's relationship with 300 women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.