Corona Vaccine: मस्तच! ‘ही’ लस ठरेल लहान मुलांसाठी संजीवनी?; सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 05:35 PM2021-06-23T17:35:49+5:302021-06-23T17:39:13+5:30

Corona Vaccine: लहान मुलांसाठीच्या लसीकरणाबाबत दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

aiims chief randeep guleria says india to get corona vaccine for children above 2 yrs by september | Corona Vaccine: मस्तच! ‘ही’ लस ठरेल लहान मुलांसाठी संजीवनी?; सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता

Corona Vaccine: मस्तच! ‘ही’ लस ठरेल लहान मुलांसाठी संजीवनी?; सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता

Next
ठळक मुद्देएम्स पाटणा आणि दिल्ली येथे लहान मुलांवरील चाचण्याडॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली महत्त्वाची माहितीसप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली: देशात कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना दिसत आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून वारंवार दिला जात आहे. यासंदर्भात सरकारने आतापासून तयारी करायला सुरुवात केली आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर अधिक परिणाम होऊ शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता लहान मुलांसाठीच्या लसीकरणाबाबत दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (aiims chief randeep guleria says india to get corona vaccine for children above 2 yrs by september) 

कोरोनाचा धोका लक्षात घेता देशातील काही ठिकाणी लहान मुलांवरील कोरोना लसीच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. एम्स पाटणा आणि दिल्ली येथे २ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरू आहे. डीसीजीआयने मुलांवर फेज II आणि III चाचणींसाठी भारत बायोटेकला मान्यता दिली होती.

 “हे फार दुर्दैवी! सुप्रीम कोर्टात असं घडत असेल तर देवच वाचवू शकतो”: कपिल सिब्बल

मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकेल

याबाबत बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोव्हॅक्सिनच्या फेज II आणि III च्या चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. तसेच फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ते मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते. तसेच कोरोनाच्या पुढील लाटेत लहान मुले संक्रमित होतील, अशी माहिती देणारा भारतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही डेटा उपलब्ध नसल्याचे डॉ. गुलेरिया यांनी नमूद केले. 

लस घ्या आणि १० टक्के सूट मिळवा; ‘या’ विमान कंपनीची भन्नाट ऑफर

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ५० हजार ८४८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून ९६.५६ टक्क्यांवर पोहोचला आहे.. दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट थोडा वाढून २.६७ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १३५८ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ६८ हजार ८१७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. देशात सध्या ६ लाख ४३ हजार १९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
 

Read in English

Web Title: aiims chief randeep guleria says india to get corona vaccine for children above 2 yrs by september

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.