कोरोना कधीच नष्ट होणार नाही का?, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणाले? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 03:52 PM2021-04-11T15:52:23+5:302021-04-11T15:54:28+5:30

Corona virus: कोविड-१९ विषाणू कधीच नष्ट होणार नाही का? कोरोनापासून जगाची नेमकी केव्हा सुटका होईल? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. याच प्रश्नांवर देशातील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी उत्तरं दिलं आहेत. 

AIIMS Director dr randeep guleria statement on when covid 19 will gone away and what are the solutions | कोरोना कधीच नष्ट होणार नाही का?, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणाले? वाचा...

कोरोना कधीच नष्ट होणार नाही का?, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणाले? वाचा...

Next

नवी दिल्ली: कोरोनामुळे संपूर्ण जग सध्या मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. त्यात भारतातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून येत्या काळात चिंता वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. महाराष्ट्रात तर कोरोना रुग्णसंख्या काही थांबण्याचं नाव घेत नसून राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तर अनेक राज्यांमध्ये याआधीच निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात उलथापालथ घालणारा कोविड-१९ विषाणू कधीच नष्ट होणार नाही का? कोरोनापासून जगाची नेमकी केव्हा सुटका होईल? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. याच प्रश्नांवर देशातील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरीया (DR. Randeep Guleria) यांनी उत्तरं दिलं आहेत. 

मुंबईत उभारले जाणार चार नवे 'जम्बो कोविड सेंटर'; राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल!

"कोविडचा विषाणू इतका पसरला आहे की तो बराच काळ राहील. पण एकवेळ अशी येईल की लोकांची इम्युनिटी पावर वाढेल आणि रुग्णसंख्या कमी होईल. त्यावेळी सध्या इतके रुग्ण आढळणार नाहीत. लसीकरण देखील एक सर्वसामान्य गोष्ट होऊ शकते. कदाचित कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटाला दरवर्षी कोरोनाची लस घेण्याची गरज पडू शकते. ज्यापद्धतीनं आपण एका तापाच्या साथीबाबत सहजपणे चर्चा करतो. त्याच पद्धतीनं कोरोना देखील सामान्य बाब होईल", असं महत्वपूर्ण निरीक्षण डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नोंदवलं. ते 'इंडिया टीव्ही'नं आयोजित केलेल्या 'डिजिटल आरोग्य संमेलनात' बोलत होते.

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा; देशात सर्वाधिक विक्रमी नोंद

लस हा कोविडवरचा उपाय नाही
"लस हा कोविड-१९ विषाणूवरील अंतिम उपाय नाही. ते एक फक्त हत्यार आहे की ज्यामाध्यमातून आपण आपली कोरोनाविरोधात संरक्षण करू शकतो. पण लसीपेक्षा सर्वात मोठं हत्यार आपल्या हातात आहे ते म्हणजे कोविड संदर्भातील सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं. लस घेण्यासोबतच नियमांचं पालन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही जागरुग होऊन लस घेत आहात तर तिच जागरुकता नियमांच्याबाबतीतही दाखवायला हवी. येत्या काळात असंही होऊ शकतं की कोरोना रुप बदलेल आणि तुम्ही घेतलेले लस देखील उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे कोरोना होऊ नये यासाठी आखून देण्यात आलेले नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार आहे", असं स्पष्ट मत गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे. 

लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही असं नाही
"कोरोना विरोधी लस तुम्हाला कोरोनाची लागण होण्यापासून वाचवत नाही. तर कोरोना झालाच तर मृत्यू होण्याचा धोका लस घेतल्यामुळे कमी होतो. लसीकरणामुळे आगामी काळात आपल्याला लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेण्याचीही गरज पडणार नाही. आपल्याला संक्रमणावर नियंत्रण मिळवता येईल. त्यात फक्त मायक्रो कन्टेंटमेंट झोन तयार करुन परिस्थिती हाताळता येईल. यात रेड, यलो आणि ग्रीन असे तीन झोन तयार करुन काम करता येईल", असंही गुलेरिया म्हणाले. 
 

Web Title: AIIMS Director dr randeep guleria statement on when covid 19 will gone away and what are the solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.