पती गे असल्याने 'एम्स'मधील डॉक्टरची आत्महत्या
By admin | Published: April 20, 2015 11:29 AM2015-04-20T11:29:33+5:302015-04-20T11:33:28+5:30
पती गे असल्याचे सांगत दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयातील 30 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केलीआहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - पती गे असल्याचे सांगत दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयातील 30 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मध्य दिल्लीतील पहाडगंज रुग्णायलात शनिवारी या डॉक्टरचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. प्रिया वेदी असे तिचे नाव असून मनगटाची नस कापून तिने तिचे जीवन संपवले. मात्र त्यापूर्वी सुसाईड नोट व फेसबूक पोस्ट अपलोड करून तिने आत्महत्येमागचे कारण स्पष्ट केले आहे. आपला नवरा गे असून तो शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यास सक्षम नसल्याचे तिने लिहीले आहे.
एम्स रुग्णालयाच्या अॅनॅस्थेशिया विभागात कार्यरत असलेल्या प्रियाचे त्याच रुग्णालयातील कमल वेदी याच्याशी पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ' आमच्या लग्नाला काहीच अर्थ नव्हता. लग्नापासून आत्तापर्यंत आम्ही एकदाही शरीराने जवळ आलेलो नाही. माझ्या नव-याचे इतर गे पुरूषांसोबत संबंध होते, तो लपून-छपून गे लोकांच्या पॉर्न फिल्म्स पहायचा आणि त्याच्या गे मित्रांशी चॅटिंगही करायचा,' असे प्रियाने सुसाईड नोटमध्ये लिहीले आहे. तसेच हुंड्यासाठी आपल्या छळ करण्यात आला होता असा आरोपही तिने केला आहे.
या सुसाईट नोटवरून पोलिसांनी प्रियाच्या नव-याला अटक केली असून त्याच्यावर हुंडाबळी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.