"ते पाकिसानसोबत काय बोलत आहेत? पुलवामानंतर जसं..."; जम्मूतील ड्रोन हल्ल्यावर ओवेसींची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 06:49 PM2021-06-28T18:49:58+5:302021-06-28T18:50:58+5:30
jammu drone attack : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा भारत सरकारकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की भारत सरकारने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जशी कारवाई केली होती, तशीच कारवाई पुन्हा करावी.
नवी दिल्ली - जम्मू विमानतळावरील हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी रविवारी दोन ड्रोनच्या सहाय्याने बॉम्ब हल्ला केला. यात हवाई दलाचे 2 कर्मचारी जखमी झाले आहेत. यानंतर आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा भारत सरकारकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की भारत सरकारने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जशी कारवाई केली होती, तशीच कारवाई पुन्हा करावी. (AIMIM chief Asaduddin owaisi on jammu drone attack)
एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी सोमवारी म्हणाले, ड्रोनने बरेच अंतर कापले आणि असे वाटते, की हे ड्रोन अमेरिका अथवा चिनी बनावटीचे असावेत. जम्मू एअर बेसवर हा पुलवामा सारखाच हल्ला आहे. आता जबाबदारी सरकारची आहे. ते पाकिसानसोबत काय बोलत आहेत? मोदी सरकार बदला घेईल का? त्याला पुलवामा हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने उत्तर देण्यात आले होते, त्याच पद्धतीने पुन्हा उत्तर द्यायला हवे."
Long distance covered by the drones makes it seem like it's either American or Chinese. It's a Pulwama-like attack on Jammu Airbase. Responsibility falls on Govt. What are they talking about with Pak? Will Modi govt retaliate? It should, as it did after Pulwama: A Owaisi, AIMIM pic.twitter.com/wnIom6iKZi
— ANI (@ANI) June 28, 2021
जय हो! भारताची मान पुन्हा अभिमानाने उंचावली; ओरिसात अग्नि प्राईम क्षेपणास्राची चाचणी यशस्वी
भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोनने करण्यात आलेले हल्ले आणि पुलवामा जिल्ह्यात एक विशेष पोलीस अधिकारी, त्यांची पत्नी आणि मुलीची दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येविरोधात शिवसेना डोगरा फ्रंट (एसएसडीएफ)च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पाकिस्तानचा झेंडा जाळला. रविवारी जम्मू विमानतळावरील हवाई दलाच्या तळावर दोन ड्रोनने बॉम्ब हल्ला केला होता. यानंतर काही तासानंतर दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात एका गावात एक एसपीओ, त्यांची पत्नी आणि मुलीची गोळ्या घालून हत्या केली होती.
आता लष्करी तळावर दिसले दोन ड्रोन -
जम्मूतील एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी दहशतवाद्यांनी लष्करी तळालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मूच्या कालूचक लष्करी तळावर दोन ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. लष्कर सज्ज असल्याने ड्रोन दिसताच त्यावर 20 ते 25 राऊंड फायरिंग करण्यात आली.
Agni Prime missile: जय हो! भारताला मिळालं मोठं यश, 'अग्नि-प्राइम' मिसाईलची यशस्वी चाचणी
कालचूक लष्करी तळावर आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास हे दोन ड्रोन घिरट्या घालत होते. त्यावेळी लष्कराने तातडीने प्रत्युत्तर देत हवेत फायरिंगला सुरुवात केली. यानंतर ड्रोन गायब झाले.