हा देश म्हणजे फक्त हिंदी, हिंदू आणि हिंदुत्व नव्हे; ओवेसींचा अमित शहांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 03:14 PM2019-09-14T15:14:47+5:302019-09-14T15:44:59+5:30
भारतात आज (14 सप्टेंबर) हिंदी दिवसाच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश, एक भाषा असे देशवासीयांना आवाहन केले
नवी दिल्ली: भारतात आज (14 सप्टेंबर) हिंदी दिवसाच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश, एक भाषा असे देशवासीयांना आवाहन केले. मात्र या आवाहनानंतर एमआयएम पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शहांना टोला लगावला आहे.
अमित शहांच्या एक देश, एक भाषा या विधानानंतर ओवैसींनी ट्विट करत म्हणटले की, हिंदी ही प्रत्येक भारतीयांची मातृभाषा नाही. तसेच आपण या देशातील अनेक मातृभाषातील विविधता आणि सौंदर्याचा सन्मान तुम्ही कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे अनुच्छेद 29 प्रमाणे प्रत्येक भारतीयांना त्यांची वेगळी भाषा आणि संस्कृती निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे असं म्हणत हा देश म्हणजे फक्त हिंदी, हिंदू आणि हिंदुत्व नव्हे असा टोला त्यांनी अमित शहांना लगावला आहे.
तत्पूर्वी अमित शहाल यांनी ट्विट करत भारत विविध भाषांचा देश असून प्रत्येक भाषांचे महत्व आहे. परंतु पूर्ण देशाची एक भाषा असणं आवश्यक आहे. तसेच देशाला एकजूट ठेवण्याचे काम सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी भाषाच करु शकते असे मत व्यक्त केले होते.
भारत विभिन्न भाषाओं का देश है और हर भाषा का अपना महत्व है परन्तु पूरे देश की एक भाषा होना अत्यंत आवश्यक है जो विश्व में भारत की पहचान बने। आज देश को एकता की डोर में बाँधने का काम अगर कोई एक भाषा कर सकती है तो वो सर्वाधिक बोले जाने वाली हिंदी भाषा ही है। pic.twitter.com/hrk1ktpDCn
— Amit Shah (@AmitShah) September 14, 2019