"मोदी चीनवर बोलण्यास घाबरतात, एवढं की चहामध्येही साखर टाकत नाहीत"'; ओवैसींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 01:06 PM2021-10-19T13:06:20+5:302021-10-19T13:09:30+5:30
Asaduddin Owaisi And Narendra Modi : असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला आहे. सीमेवर चीनची घुसखोरी आणि जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांबाबत मोदींवर निशाणा साधला आहे. हैदराबादमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. "पंतप्रधान नरेंद्र मोदीचीनवर बोलण्यास नेहमीच घाबरतात. एवढं की चहामध्ये साखर देखील टाकत नाहीत जेणेकरून चीनचा उल्लेख होऊ येऊ नये. काश्मीरमध्ये बाहेरील लोकांच्या हत्या आणि चीनकडून घुसखोरीच्या घटनांवरून ओवैसींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
असदुद्दीन ओवैसी यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून देखील मोदींना सणसणीत टोला लगावला आहे. "मोदी दोन गोष्टींबद्दल तोंड उघडत नाहीत. एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची वाढते दर आणि दुसरी म्हणजे चीनची घुसखोरी. चीन आपल्या देशात घुसून बसला आहे पण ते काहीच करत नाहीत" असं देखील ओवैसी यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी टी-20 विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये भारताचे 9 सैनिक शहीद झाले आणि दुसरीकडे मोदी सरकार 24 ऑक्टोबर रोजी क्रिकेट सामना खेळत आहे,'अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.
#WATCH | PM Modi never speaks on 2 things -- rise in petrol and diesel prices & China sitting in our territory in Ladakh. PM is afraid of speaking on China. Our 9 soldiers died (in J&K) & on Oct 24 India-Pakistan T20 match will happen: AIMIM chief Asaduddin Owaisi, in Hyderabad pic.twitter.com/Q0AabFZ0BU
— ANI (@ANI) October 19, 2021
'आपले सैनिक सीमेवर शहीद होत आहेत आणि तुम्ही भारत-पाक T-20 खेळवणार?'
यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हणाले की, 'नरेंद्र मोदी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना म्हणाले होते, सैनिक मरत आहे आणि मनमोहन सिंग सरकार बिर्याणी खाऊ घालत आहे. आणि आता 9 सैनिक शहीद होतात आणि तुम्ही टी-20 खेळवणार? काश्मीरमध्ये पाकिस्तान भारतीयांच्या जीवाशी खेळत आहे,'असंही ओवैसी म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील हत्यांवर ओवैसी म्हणाले- 'काश्मीरमध्ये टार्गेट किलींग होत आहे. भारताच्या सीमा बंद केल्या तरी ड्रोनमधून शस्त्रे येत आहेत. इंटेलिजंस काय करत आहे? अमित शहा काय करत आहेत? 370 काढून टाकल्यानंतर काश्मीरमध्ये सर्व शांत होईल, असं वाटलं होतं. पण, असं काहीच झालं नाही. सीमेपलीकडून दहशतवादी येत आहेत.
केंद्र सरकारची पाक सीमेवरील नियंत्रण रेषेसाठी काही योजना आहे का?
ओवेसी पुढे म्हणाले, 'जम्मू-काश्मीरमध्ये दररोज हत्या होत आहेत. आमचे सैनिक मारले जात आहेत. मग पाकिस्तानने NSA बरोबर चर्चा करण्याचा काय अर्थ आहे? जर तुम्ही खोऱ्यातील हत्या थांबवल्या नाहीत तर देशाच्या कानाकोपऱ्यात त्याची पुनरावृत्ती होईल. आता तुम्ही NSA बरोबर काय चर्चा कराल? भाजपकडे स्थिर परराष्ट्र धोरण नाही. अशा वातावरणात तुम्ही त्याच्याशी बोललात तर काय होईल? केंद्र सरकारची पाक सीमेवरील नियंत्रण रेषेसाठी काही योजना आहे का?, असे अनेक प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केले.