UP विधानसभा निवडणुकांवर ओवेसींची नजर; १०० जागांवर MIM उमेदवार उभे करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 07:10 PM2021-06-27T19:10:16+5:302021-06-27T19:13:33+5:30
UP Election : पुढील वर्षी पार पडणार उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका. राजकीय घडामोडींना वेग.
पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका (UP Assembly Election 2022) पार पडणार आहेत. दरम्यान, आता राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएमनं (AIMIM) निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी यासंदर्भात घोषणा केली. तसंच या निवडणुकांमध्ये १०० उमेदवार उभे करणार आहे.
"उत्तर प्रदेशा निवडणुकांबाबत काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवू इच्छित आहे. आम्ही विधानसभेच्या १०० जागांवर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानं उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि आम्ही उमेदवारांचे अर्ज पत्रही जारी केलं आहे," असं ओवेसी म्हणाले. त्यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.
2) हम @oprajbhar साहब 'भागीदारी संकल्प मोर्चा' के साथ हैं।
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 27, 2021
3) हमारी और किसी पार्टी से चुनाव या गठबंधन के सिलसिले में कोई बात नहीं हुई है।2/2
"आम्ही सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकार राजभर यांच्या भागीदारी संकल्प मोर्चासोबत आहोत. आमची अन्य कोणत्याही पक्षाशी किंवा निवडणुका एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली नाही," असंही ओवेसी यांनी स्पष्ट केलं. ओमप्रकाश राजभर यांनी भागीदारी संकल्प मोर्चाची स्थापना केली आहे. यापूर्वी रविवारी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बसपा आणि एमआयएमच्या निवडणुका एकत्र लढण्याच्या चर्चांचंही बसपाच्या प्रमुख मायावती यांनी खंडन केलं. तसंच हे वृत्त तथ्यहिन आणि चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.