२०२४ पर्यंत देशात १०० विमानतळे, हेलिपॅड विकसित करण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 03:19 AM2020-10-25T03:19:14+5:302020-10-25T06:42:05+5:30

देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटीचे जाळे मजबूत करून प्रादेशिक मार्गांवर परवडणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम, तसेच फायदेशीर हवाई प्रवास सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी ‘उडाण’ ही योजना आहे.

Aims to develop 100 airports, helipads in the country by 2024 | २०२४ पर्यंत देशात १०० विमानतळे, हेलिपॅड विकसित करण्याचे लक्ष्य

२०२४ पर्यंत देशात १०० विमानतळे, हेलिपॅड विकसित करण्याचे लक्ष्य

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘उडाण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत २०२४ सालापर्यंत १०० विमानतळे, जलविमानतळे, हेलिपॅड विकसित करण्याचे लक्ष्य भारतीयविमानतळ प्राधिकरणाने ठेवले आहे.
देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटीचे जाळे मजबूत करून प्रादेशिक मार्गांवर परवडणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम, तसेच फायदेशीर हवाई प्रवास सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी ‘उडाण’ ही योजना आहे. बुधवारी या योजनेचा  चौथा वर्धापन दिन होता.
‘उडाण’अंतर्गत देशाच्या सर्व कानाकोपऱ्यांतील एकूण २८५ हवाई मार्ग, पाच हेलिपोर्टसह मुळीच उपयोगात नसलेली व फारसा उपयोग नसलेली विमानतळे समाविष्ट करण्यात आली आहेत.

Web Title: Aims to develop 100 airports, helipads in the country by 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.