एआयपीएमटी कडेकोट बंदोबस्तात
By admin | Published: July 26, 2015 03:51 AM2015-07-26T03:51:39+5:302015-07-26T03:51:39+5:30
पेपरफुटीमुळे वादात अडकलेली अखिल भारतीय वैद्यकीय पूर्वपरीक्षा (एआयपीएमटी) शनिवारी देश-विदेशातील ५० शहरांमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात शांततेत पार पडली.
नवी दिल्ली : पेपरफुटीमुळे वादात अडकलेली अखिल भारतीय वैद्यकीय पूर्वपरीक्षा (एआयपीएमटी) शनिवारी देश-विदेशातील ५० शहरांमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात शांततेत पार पडली. या परीक्षेसाठीच्या दिशानिर्देशांचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र फटका बसला. एका केंद्रात पूर्ण बाह्णांचा शर्ट घालून आलेल्या विद्यार्थ्याला बाह्णा कापल्यानंतरच परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला. तर एका ननने हिजाब आणि गळ्यातील क्रॉस काढण्यास नकार दिल्याने तिला एआयपीएमटीला मुकावे लागले.
विविध केंद्रांवर विद्यार्थी स्कार्फ, कानातील रिंग आणि इतर प्रतिबंधक वस्तू बाहेर काढून ठेवताना दृष्टीस पडले. अंगझडतीनंतरच त्यांना आत प्रवेश देण्यात आला. प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात फेरपरीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. या परीक्षेत कुठलाही गैरप्रकार टाळण्यासाठी सीबीएसईने परीक्षार्र्थ्यांना ड्रेसकोडसह काही नियम आखून दिले होते.