बँकॉकजवळ एअर अँब्युलन्स कोसळून पायलट ठार, ४ भारतीय जखमी

By admin | Published: March 7, 2017 09:47 AM2017-03-07T09:47:14+5:302017-03-07T09:48:56+5:30

मेदांता हॉस्पिटलच्या एअर अँब्युलन्सला आग लागून ते बँकॉकजवळ कोसळल्याने पायलट ठार तर ४ भारतीय जखमी झाले आहेत.

Air ambulance collapses near Bangkok, pilot killed, 4 injured | बँकॉकजवळ एअर अँब्युलन्स कोसळून पायलट ठार, ४ भारतीय जखमी

बँकॉकजवळ एअर अँब्युलन्स कोसळून पायलट ठार, ४ भारतीय जखमी

Next
ऑनलाइन लोकमत
बँकॉक, दि. ७ - मेदांता हॉस्पिटलच्या एअर अँब्युलन्सला आग लागून ते बँकॉकजवळ कोसळल्याने पायलट मृत्यूमुखी पडला असून इतर चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यासंबंधी काल रात्री ट्विट करून माहिती दिली असून लष्कराच्या हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 
नवी दिल्ली येथून बँकॉकला जाणारे हे विमान काल दुपारी इंधन भरण्यासाठी कोलकाता येथे काही काळ थांबले होते, त्यानंतर विमानाने बँकॉकच्या दिशेने उड्डाण केले असता त्याला आग लागली व ते नखोन पॅथम विमानतळाजवळ कोसळले. यावेली विमानात पाच प्रवासी होते, त्यापैकी पायलटचा मृत्यू झाला असून इतरांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 
दरम्यान मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरेश त्रेहान यांनी या दुर्दैवी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. 
 

Web Title: Air ambulance collapses near Bangkok, pilot killed, 4 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.