कोची विमानतळावर एअर अरेबियाच्या विमानात हायड्रोलिक बिघाड, सर्व प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 09:16 PM2022-07-15T21:16:17+5:302022-07-15T21:19:06+5:30
Air Arabia Flight: संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथून कोची विमानतळावर आलेल्या एअर अरेबियाच्या विमानात लँडिंगदरम्यान बिघाड झाल्याचे आढळून आले.
नवी दिल्ली : कोची विमानतळावर एअर अरेबियाच्या विमानात (G9-426) शुक्रवारी संध्याकाळी बिघाड झाल्याची घटना घडली. संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथून कोची विमानतळावर आलेल्या एअर अरेबियाच्या विमानात लँडिंगदरम्यान बिघाड झाल्याचे आढळून आले.
लँडिंगच्यावेळी विमानामध्ये हायड्रोलिक बिघाड झाला होता. मात्र, विमानातील सर्व प्रवासी सुखरूप उतरले. या विमानात 222 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स होते. यासंदर्भातील माहिती कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने दिली.
Air Arabia flight (G9-426) from Sharjah to Cochin was involved in Hydraulic failure. The aircraft landed safely on the runway and shut down the engine. The aircraft has been towed to the bay: DGCA
— ANI (@ANI) July 15, 2022
दरम्यान, एअर अरेबियाच्या विमानाच्या लँडिंगवेळी कोचीन विमानतळावर इमर्जन्सी लागू करण्यात आली होती. मात्र, आता सर्व उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत. इंडिगोचे पहिले विमान चेन्नईला रवाना झाले. तर जवळपास 8:22 च्या सुमारास संपूर्ण इमर्जन्सी मागे घेण्यात आली.