एअरबसची दिल्लीत २७५ कोटींची गुंतवणूक

By Admin | Published: March 19, 2016 01:39 AM2016-03-19T01:39:25+5:302016-03-19T01:39:25+5:30

विमाननिर्मिती क्षेत्रातील प्रसिध्द युरोपियन कंपनी एअरबस भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लवकरच ४ कोटी डॉलर्स (सुमारे २७५ कोटी रूपये) गुंतवणार आहे.

Air Arabia invested 275 crores in Delhi | एअरबसची दिल्लीत २७५ कोटींची गुंतवणूक

एअरबसची दिल्लीत २७५ कोटींची गुंतवणूक

googlenewsNext

नवी दिल्ली : विमाननिर्मिती क्षेत्रातील प्रसिध्द युरोपियन कंपनी एअरबस भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लवकरच ४ कोटी डॉलर्स (सुमारे २७५ कोटी रूपये) गुंतवणार आहे.
या गुंतवणुकीतून दिल्ली राजधानी क्षेत्रात (एनसीआर) एक अद्ययावत पायलट प्रशिक्षण, तसेच विमान दुरुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा एअरबसचा इरादा आहे.
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारत आहे, अशी माहिती एअरबसच्या भारत विभागीय शाखेचे अध्यक्ष श्रीनिवासन द्वारकानाथ यांनी पत्रकारांना दिली.
प्रशिक्षण केंद्र्राचा प्रारंभ २0१७ मध्ये होणार असून, २0१८ ते २0२८ या १0 वर्षांत या केंद्राद्वारे एअरबसच्या ८ हजार प्रशिक्षित पायलटस्चे तसेच २ हजार विमान दुरूस्ती अभियंत्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असेल. एअरबस कंपनीतर्फे संचलित या केंद्रात एअरबस उद्योगातील जागतिक विशेषज्ञ प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणार्थींना ए ३२0 विमानांच्या संपूर्ण उड्डाण प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवातीला ४ सिम्युलेटर्स स्थापन केले जाणार असून कालांतराने त्यांची संख्या वाढवली जाईल.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे भारताच्या कौशल्य विकास क्षेत्रात तर लक्षणीय भर पडेलच, याखेरीज विमान उद्योगाच्या जागतिक दराच्या तुलनेत भारताच्या हवाई क्षेत्राची बाजारपेठही दुप्पट गतीने वाढेल, असा दावा श्रीनिवासन यांनी केला आहे.
(विशेष प्रतिनिधी)

- एअरबसच्या अंदाजानुसार २0३४ पर्यंत भारताला १६00 पेक्षा अधिक प्रवासी व मालवाहतूक विमानांची गरज भासणार आहे. त्यासाठी जसे प्रशिक्षित पायलटस् हवेत, त्याचबरोबर प्रशिक्षित विमान दुरूस्ती अभियंत्यांचीही गरज भासणार आहे.
- एअरबस कंपनीच्या अपेक्षेनुसार येत्या दहा वर्षात प्रत्येक सप्ताहाला साधारणत: एक याप्रमाणे भारताला एअरबस विमान पुरवले जाईल. उच्चतम गुणवत्ता असलेल्या प्रशिक्षणाची त्यासाठी गरज आहेच.
- भारत सरकारने गेल्यावर्षी सुरू केलेल्या स्कील इंडिया उपक्रमानुसार या प्रशिक्षण केंद्राचा दिल्लीत प्रारंभ होत असून त्याला उत्तम यश व प्रतिसाद मिळेल, असे मत श्रीनिवासन यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Air Arabia invested 275 crores in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.