ओडिशा-झारखंड सीमेवर हवाई दलाचं विमान दुर्घटनाग्रस्त, पायलट गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 03:03 PM2018-03-20T15:03:07+5:302018-03-20T15:03:07+5:30
ओडिशा-झारखंड सीमेवर मंगळवारी दुपारच्या दरम्यान हवाई दलाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे.
नवी दिल्ली- ओडिशा-झारखंड सीमेवर मंगळवारी दुपारच्या दरम्यान हवाई दलाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. हा विमान अपघात महुलदानगिरी गावात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या पायलटची प्रकृती गंभीर आहे. यापूर्वी हवाई दलाचं विमान दुर्घटनाग्रस्त होण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.
गेल्या वर्षी राजस्थानमधल्या बालेसरमध्येही एअरफोर्सचं एमआयजी-23 या विमानाला अपघात झाला होता. त्यानंतर विमानाचे अवशेष सापडले होते. या दुर्घटनेत विमान पूर्णतः नेस्तनाबूत झालं होतं. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मिग-23 आणि मिग-27 हे विमान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मिग विमान दुर्घटनाग्रस्त होतायत. हवाई दलाची अनेक विमानं ही अपघाताची शिकार झाली आहेत.
गेल्या वर्षी एअर चीफ मार्शल म्हणाले होते की, शांतीच्या परिस्थितीतही जवान शहीद होणं चिंताजनक आहे. आम्ही अपघात टाळण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलतो आहे. आमच्याकडे आता कमी प्रमाणात लढाऊ विमानं उपलब्ध आहेत. परंतु तरीही आम्ही कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी समर्थ आहोत.