Indian Airforce Day: 8000 फूट उंचावरुन तिरंगा फडकवत भारतीय जवानांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 09:20 AM2018-10-08T09:20:09+5:302018-10-08T09:25:52+5:30
आकाशगंगा पथकातील जवानांनी 8 हजार फूट उंचीवरुन ही कसरत केली आहे. वायुसेनेकडून गगनशक्ती या अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
गाझियाबाद - देशभरात आज वायुसेना दिवस साजरा करण्यात येत आहे. गायझियाबाद येथील हिंडन एअर फोर्स स्टेशनवर वायुसेनेच्या 87 व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वायुसेना दलातील जवानांनी जगाला आपल्या देशाची ताकद दाखवताना तब्बल 8 हजार फूट उंचीवरुन उडी घेतली. त्यामुळे 8 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकताना देशाने पाहिला.
आकाशगंगा पथकातील जवानांनी 8 हजार फूट उंचीवरुन ही कसरत केली आहे. वायुसेनेकडून गगनशक्ती या अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. गगनशक्ती हे या वर्षीपासूनच युद्ध अभ्यासात सहभागी करण्यात आले आहे. वायुसेनेच्या या कार्यक्रमाला ग्रुप कॅप्टन आणि भारतरत्नसचिन तेंडुलकर यांचाही सहभाग असणार आहे. वायुसेनेच्या हरक्युलिस, ग्लोबमास्टर सी-17, मिराज, सारंग आणि सूर्य किरण पथकांच्या चित्तथराक कसरती अंगावर रोमांच उभा करतील, अशाच आहेत. तर रोहिणी आणि स्पायडर हे भारताच्या वायुदलातील सशक्तीचा उत्तम नमुना आहे. तर वायुसेनेच्या सर्वात ताकदवान कमांडो गरुडचे पथकही आपली ताकद आणि वीरतेचे प्रदर्शन करणार आहे. दरम्यान, वायूसेना दिनाचे औचित्य साधत भारतीय वायुसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.
#WATCH Indian Air Force Day celebrations underway at Hindon Air Force Station in Ghaziabad pic.twitter.com/YH2ziVBZwt
— ANI UP (@ANINewsUP) October 8, 2018