हवाई दलाचे हॉक विमान शेतात कोसळले; सोमवारी बॉम्ब पडलेला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:52 PM2024-02-13T18:52:38+5:302024-02-13T18:52:53+5:30

हवाई दलाने विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीचे गठन केले आहे.

Air Force Hawk plane crashes in west Bengal field; The bomb fell on Monday | हवाई दलाचे हॉक विमान शेतात कोसळले; सोमवारी बॉम्ब पडलेला

हवाई दलाचे हॉक विमान शेतात कोसळले; सोमवारी बॉम्ब पडलेला

भारतीय हवाई दलाचे हॉक ट्रेनर विमान पश्चिम बंगालच्या कलाईकुंडा एअरबेसजवळ दुर्घटनाग्रस्त झाले आहे. विमानात असलेले दोन पायलट सुरक्षित बाहेर निघाले आहेत. शेतात कोसळल्याने विमानावर चिखलाचे अस्तर पसरले होते. 

हवाई दलाने विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीचे गठन केले आहे. तांत्रिक बिघाड किंवा मानवीय त्रुटी आहे का याचे कारण ही समिती शोधणार आहे. 

पायलटनी पॅराशूटच्या मदतीने उडी मारून जीव वाचविले आहेत. दुपारी साडे तीन वाजता हा अपघात घडला. भातशेतीमध्ये हे विमान कोसळले आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. हवाई दलाचे अधिकारी हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचले आहेत.

सोमवारी संकरेल ब्लॉकच्या केश्यापाटा भागातील भातशेतीत बॉम्ब पडला होता. लक्ष्यापासून भटकून हा बॉम्ब तिथे पडल्याचे हवाई दलाने म्हटले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी विमान अपघात झाला आहे. 

Web Title: Air Force Hawk plane crashes in west Bengal field; The bomb fell on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.