हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 05:45 PM2020-07-19T17:45:38+5:302020-07-19T18:02:16+5:30
राफेल हे लढाऊ विमान चीनच्या विमानांसह अमेरिकेच्या पाकिस्तानला दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानांवर हल्ला करण्यासाठी ताकदवान आहे. तसेच अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे वाहून नेण्याचीही क्षमता आहे.
नवी दिल्ली : भारत आणि चीनदरम्यान भलेही शांततेचे वातावरण असले तरीही भारतीय सैन्य कोणत्याही बाबतीत कमतरता ठेवू इच्छित नाहीय. या महिन्याच्या अखेरीस भारताला राफेल विमान मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर हवाई दलाकडून दोन दिवसांची बैठक बोलावण्यात आली असून हवाई दल प्रमुख आर के अस भदौरिया यांच्यासह हवाईदलाचे मोठे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये चीनच्या सीमेवरील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.
या बैठकीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर राफेलही तैनात केले जाण्याची शक्यता आहे. राफेल हे जगातील सर्वात शक्तीशाली लढाऊ विमानांपैकी एक आहे. राफेल देशात आल्या आल्याच जर सीमेवर तैनात झाले तर हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. याशिवाय दक्षिण आशियामध्ये मानसिक दबावासाठीही परिणामकारक ठरणार आहे.
राफेल हे लढाऊ विमान चीनच्या विमानांसह अमेरिकेच्या पाकिस्तानला दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानांवर हल्ला करण्यासाठी ताकदवान आहे. तसेच अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे वाहून नेण्याचीही क्षमता आहे. चीनच्या सीमेवर भारताची सुखोई-30 आणि मिराज 2000 ही लढाऊ विमाने तैनात आहेत. राफेल या सोबत आल्यास भारताच्या लांब पल्ल्यावर मारा करण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे.
वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या 22 तारखेला हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक होणार आहे. यामध्ये देशाच्या सुरक्षेवर चर्चा केली जाणार आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार भदौरिया यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार असून या बैठकीचा मुख्य हेतू हा चीनच्या सीमेवरील परिस्थिती आणि लडाखमध्ये तैनाती असणार आहे. या बैठकीमध्ये सातही कमांडर-इन-चीफ सहभागी होणार आहेत.
मोठी शक्ती मिळणार
पुढील आठवड्यात भारतीय हवाई दलाला मोठी ताकद मिळणार आहे. राफेल लढाऊ विमाने पंजाबच्या अंबाला हवाईतळावर उतरविण्यात येणार आहेत. सुरक्षा मंत्रालयाने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार दोन सीट असलेली तीन प्रशिक्षण विमानांसह पहिली ४ राफेल लढाऊ विमाने थेट फ्रान्सहून उड्डाण करणार आहेत. ही विमाने आरबी सिरीजची असणार आहेत. पहिले विमान १७ गोल्डन एरोजचे कमांडिंग ऑफिसर फ्रान्सच्या पायलटसोबत उड्डाण करणार आहे. हे विमान हवाईदलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांच्या सन्मानासाठी झेप घेणार आहे. भदौरिया यांनी या राफेल विमानांच्या करारावेळी महत्वाची भूमिका निभावली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई
चीन गांगरला! जपान भारतापेक्षाही जबर दणका देण्याच्या तयारीत; 57 कंपन्यांना दिले आदेश
SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल
दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर
चॅलेंज! कोरोनावर जगात कोणीही लस शोधुदे; भारताशिवाय उत्पादन अशक्यच
Video: "सुशांतचा आत्मा स्वर्गात, त्याच्यासोबत महिलाही"; जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा
ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी
चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर
लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...