Air Force: लस घेतली नाही, कारणही दिले नाही! हवाई दलाच्या नोकरीला मुकला; कर्मचारी बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 04:47 PM2021-08-12T16:47:55+5:302021-08-12T16:52:17+5:30

IAF strict on Corona Vaccination: सॉलिसिटर जनरल देवांग व्यास यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, यापैकी एकाने या नोटीसला उत्तर दिले नाही. यामुळे त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

Air Force: IAF sacks staffer for refusing to get vaccinated against corona virus | Air Force: लस घेतली नाही, कारणही दिले नाही! हवाई दलाच्या नोकरीला मुकला; कर्मचारी बडतर्फ

Air Force: लस घेतली नाही, कारणही दिले नाही! हवाई दलाच्या नोकरीला मुकला; कर्मचारी बडतर्फ

Next

कोरोना लस (Corona Vaccine) टोचून घेण्यास नकार देणाऱ्या हवाई दलाच्या (Air Force) एका कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. लस घेणे सेवा शर्थींमध्ये बंधनकारक करण्यात आले होते. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल देवांग व्यास यांनी हवाई दलाचा एक कर्मचारी योगेंद्र कुमार याच्या याचिकेवर बुधवारी उत्त न्यायालयामध्ये सोपविण्यात आलेल्या एका अहवालावर ही माहिती दिली. (one IAF employee has been terminated for failing to respond to the show cause notice for corona vaccination served for the service condition violation.)

न्यायमूर्ती ए जे देसाई आणि ए पी ठाकरे यांच्या खंडपीठाने सांगितले की, देशभरातील 9 कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेण्यास नकार दिला आहे. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. 

सॉलिसिटर जनरल देवांग व्यास यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, यापैकी एकाने या नोटीसला उत्तर दिले नाही. यामुळे त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही. व्यास यांनी सांगितले की लसीकरण हवाई दलामध्ये बंधनकारक करण्यात आले आहे. नोकरी स्वीकारताना जी शपथ घेतली जाते त्याच्याशी संबंधीत सेवा शर्थींमध्ये लसीकरण देखील प्राधान्याने घेण्यात आलेले आहे. 

तर याचिका करणारा कर्माचारी योगेंद्र कुमार याने आपण कोरोना लस घेण्याच्या स्थितीत नव्हतो, यामुळे हवाई दलाने पाठविलेल्या नोटिशीवर न्य़ायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने योगेंद्र कुमार याचे म्हणणे विचारात घ्यावे अशी सूचना हवाई दलाला केली. योगेंद्र कुमार यांच्यासह आठ जणांना न्यायालयाने संरक्षण दिले आहे. कुमारने न्यायालयाला केंद्र सरकारचे लस घेणे ऐच्छिक असल्याचे आदेश दाखविले आणि कारवाई न करण्याचे हवाई दलाला आदेश देण्याची विनंती केली. 

Web Title: Air Force: IAF sacks staffer for refusing to get vaccinated against corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.