Video : पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून कार्गो विमानाची घुसखोरी; सुखोई विमानांनी घेरले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 06:27 PM2019-05-10T18:27:53+5:302019-05-10T19:03:18+5:30

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द विमानांसाठी बंद केली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानेही वळसा घालून भारतात किंवा पलिकडे जात-येत आहेत.

Air Force Jets Force cargo Plane From Karachi To Land In Jaipur | Video : पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून कार्गो विमानाची घुसखोरी; सुखोई विमानांनी घेरले

Video : पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून कार्गो विमानाची घुसखोरी; सुखोई विमानांनी घेरले

Next

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटवर चढविलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे पाकिस्तानने हवाई हद्द सील केली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून मालवाहतूक करणारे विमान भारतीय हद्दीत आल्याने हवाई दल सतर्क झाले आहे. सुखोई लढाऊ विमानांनी या विमानाला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग पाडले आहे. हे विमान जॉर्जियाचे असून कराचीहून या विमानाने उड्डाण केले होते. 


बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द विमानांसाठी बंद केली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानेही वळसा घालून भारतात किंवा पलिकडे जात-येत आहेत. यामुळे बंदी असतानाही अँटोनोव्ह एएन-12 हे मोठे मालवाहतूक विमान पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून भारतीय हवाई हद्दीत आलेच कसे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या विमानातून कशाची वाहतूक केली जात आहे. त्या विमानाला पाकिस्तानने का नाही रोखले, आदी प्रश्न उपस्थित होत आहेत. 




यामुळे हे मालवाहू विमान भारतीय हवाई क्षेत्रात येताच भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी लगेचच हवेत झेप घेतली आणि त्या विमानाचा पाठलाग केला. मालवाहतूक विमानाच्या पायलटला विमान जयपूर विमानतळावर उतरवण्याचे आदेश दिले. या प्रकाराबाबत पायलटची चौकशी करण्यात येत असून हे विमान दिल्लीला जात होते, अशी माहिती समोर आली आहे. 



 

Web Title: Air Force Jets Force cargo Plane From Karachi To Land In Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.