अरुणाचल प्रदेशात वायुसेनेचे Mi-17 हेलीकॉप्टर कोसळले, सुदैवाने पायलट आणि क्रू मेंबर सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 05:12 PM2021-11-18T17:12:43+5:302021-11-18T17:12:50+5:30

या अपघाताचे कारण शोधण्यासाठी वायुसेनेकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले जातील.

Air Force Mi-17 helicopter crashes in Arunachal Pradesh, fortunately pilot and crew members safe | अरुणाचल प्रदेशात वायुसेनेचे Mi-17 हेलीकॉप्टर कोसळले, सुदैवाने पायलट आणि क्रू मेंबर सुरक्षित

अरुणाचल प्रदेशात वायुसेनेचे Mi-17 हेलीकॉप्टर कोसळले, सुदैवाने पायलट आणि क्रू मेंबर सुरक्षित

Next

नवी दिल्ली: भारतीय वायुसेनेचे(IAF) Mi-17 हेलिकॉप्टर गुरुवारी अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात विमानातील 2 पायलट आणि 3 क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर देखभालीसाठी वापरण्यात येत होते. दरम्यान, या अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले जातील. 

यापूर्वीही सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील शिवगड धार भागात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते, ज्यामध्ये दोन पायलट ठार झाले होते. ऑगस्टमध्येही जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात रणजीत सागर धरणाजवळ हेलिकॉप्टर अपघातात दोन पायलट ठार झाले होते. 21 ऑक्टोबरलाही मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात भारतीय वायुसेनेचे लडाऊ विमान मिराज-2000 कोसळले होते. क्रॅश होण्यापूर्वी पायलटने पॅराशूट घेऊन उडी मारल्याने तो या अपघातात वाचला होता. दैनंदीन ट्रेनिंगदरम्यान हा अपघात झाला होता.

2017 मध्ये हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये 7 जवान शहीद
2017 मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये Mi-17-V5 हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. त्या अपघातात 7 जवान शहीद झाले होते. अपघाताचा व्हिडिओही समोर आला होता. 6 ऑक्टोबर 2017 रोजी, भारतीय वायुसेनेचे एक Mi-17-V5 हेलिकॉप्टर आपल्या नियमित मोहिमेवर उड्डाण करत असताना हेलिकॉप्टरला अपघात झाला होता.
    

Web Title: Air Force Mi-17 helicopter crashes in Arunachal Pradesh, fortunately pilot and crew members safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.