राजस्थानमध्ये हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळलं; दोन वैमानिकांचा अपघातात मृत्यू, संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 11:52 PM2022-07-28T23:52:18+5:302022-07-28T23:56:20+5:30
सदर अपघात राजस्थानमधील बारमेरच्या भीमडा गावात झाला आहे.
नवी दिल्ली- राजस्थानमधील बडमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघात झालेल्या मीग-२१ या लढाऊ विमानात दोन वैमानिक होते. या दोघांचाही अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी (२८ जुलै) रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
सदर अपघात राजस्थानमधील बारमेरच्या भीमडा गावात झाला आहे. सध्या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. अपघातापूर्वी मिग-२१ हे विमान भीमडा गावाभोवती फिरत होते, अशी माहिती समोर येत आहे.
Rajasthan | A MiG-21 fighter aircraft of the Indian Air Force crashed near Barmer district. Further details awaited pic.twitter.com/egJweDNL4a
— ANI (@ANI) July 28, 2022
राजस्थानमधील बारमेरजवळ आयएएफच्या मिग-२१ ट्रेनर विमानाच्या अपघातात प्राण गमावलेल्या दोन्ही हवाई योद्धांबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
Defence minister Rajnath Singh expresses condolences for the two Air Warriors who lost their lives in an accident of IAF’s Mig-21 trainer aircraft near Barmer in Rajasthan pic.twitter.com/w8rgOD6KAj
— ANI (@ANI) July 28, 2022