जोधपूरमध्ये हवाई दलाचे MIG-23 विमान कोसळले

By admin | Published: July 6, 2017 04:40 PM2017-07-06T16:40:19+5:302017-07-06T17:08:08+5:30

राजस्थानमधील जोधपूरमध्ये हवाई दलाचे MIG-23 लढाऊ विमान कोसळले. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.

Air Force MIG-23 aircraft collapsed in Jodhpur | जोधपूरमध्ये हवाई दलाचे MIG-23 विमान कोसळले

जोधपूरमध्ये हवाई दलाचे MIG-23 विमान कोसळले

Next
ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. 06 - राजस्थानमधील जोधपूरमध्ये हवाई दलाचे MIG-23 लढाऊ विमान कोसळले. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत विमानातील दोन्ही वैमानिक सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील  बालेसार येथे हवाई दलाचे MIG-23 हे लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले. गेल्या आठवड्याभरात हवाई दलाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 4 जुलै रोजी अरुणाचल प्रदेशमधील पापूमपरे येथे बचावकार्यासाठी गेलेले हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यानंतर बुधवारी या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, आज झालेल्या हवाई दलाच्या MIG-23 या लढाऊ विमानाच्या दुर्घटनेचे कारण अस्पष्ट असून या दुर्घटनेविषयी अद्याप हवाई दलाने प्रतिक्रिया दिलेली नाही. 
 

आणखी वाचा

दोन दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात....
याआधी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 4 जुलै रोजी अरुणाचल प्रदेशमधील पापूमपरे येथे बचावकार्यासाठी गेलेले हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यानंतर बुधवारी या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. अरुणाचल प्रदेशच्या पापुमपरे भागामध्ये हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. मंगळवारी पूरस्थिती असलेल्या परिसरामध्ये मदतकार्य करत असताना अरुणाचल प्रदेशमधील सगली गावाजवळ हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर रडारवरून गायब झाल्याची माहिती मिळाली होती. इटानगर ते नहरलगूनदरम्यान हेलिकॉप्टर अचानक रडारवरून गायब झाले होते. ही घटना घडली त्याचवेळी केंद्रीय गृह राज्य मंत्री किरेन रिजिजू यांच्या हेलिकॉप्टरचीही इमर्जन्सी लॅन्डिंग करावी लागली होती. इटानगरमध्ये पॉलिटेक्निक क्रीडा मैदानात रिजिजू यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डिंग केले होते. रिजिजू यांनीच मीडियाला याबाबत माहिती दिली होती. 
 
MIG-23 विमानाची खासियत...
- भारतीय हवाई दलातील MIG-23 हे एक लढाऊ विमान असून सोवियत संघमधील मिकॉयन-गुरेविच डिझाईन ब्युरोद्वारा तयार करण्यात आले आहे. या विमानाची लांबी 17 मीटर इतकी आहे. तसेच, या विमानचा वापर प्रशिक्षण देण्यापासून ते युद्धासाठी करण्यात येतो.  
 

 

Web Title: Air Force MIG-23 aircraft collapsed in Jodhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.