हेरगिरीप्रकरणी हवाई दलाच्या कर्मचा-याला अटक
By admin | Published: September 1, 2014 12:38 PM2014-09-01T12:38:50+5:302014-09-01T13:12:25+5:30
इंटरनेटवरुन ओळख झालेल्या पाकिस्तानी महिलेला हवाई दलातील गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी हवाई दलात कार्यरत असलेल्या कर्मचा-याला अटक केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पठाणकोट, दि. १ - इंटरनेटवरुन ओळख झालेल्या पाकिस्तानी महिलेला हवाई दलातील गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी हवाई दलात कार्यरत असलेल्या कर्मचा-याला अटक केली आहे. सुनील कुमार (वय २४ ) असे या कर्मचा-याचे नाव असून गोपनीय माहिती पुरवण्याच्या मोबदल्यात त्याला भरभक्कम आर्थिक मोबदलाही मिळत होता.
हवाई दलाच्या पठाण कोट येथील विमानतळावर सुनील कुमार हा कार्यरत होता. हवाई दलाच्या वरिष्ठ अधिका-यांना सुनीलवर संशय आल्याने त्याच्या कॉम्प्यूटर आणि ईमेलवर नजर ठेवण्यात आली होती. यात सुनीलकुमार पाकिस्तानमधील मीना रैना नामक एका महिलेशी संपर्कात असल्याचे समोर आले. मीना रैनाने इंटरनेटद्वारे सुनील कुमारशी संपर्क साधून त्यांच्याशी ओळख वाढवली. यानंतर तिने सुनील कुमारकडून हवाई दलातील गोपनीय माहिती मिळवून त्यामोबदल्यात सुनीलकुमारला पैसे दिल्याचे निष्पन्न झाले. यानंतर हवाई दलाने सुनील कुमारला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले. कोर्टाने सुनीलकुमारला १० दिवसांसाठी पोलिस कोठडीत पाठवले आहे.