हवाई दलाची ताकद वाढणार, 97 लढाऊ विमाने अन् 150 हेलिकॉप्टर खरेदीला केंद्राची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 04:24 PM2023-11-30T16:24:59+5:302023-11-30T16:25:35+5:30
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला..
Tejas Aircraft: भारतीय सशस्त्र दलांची ताकद आणखी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैन्याची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी 97 तेजस लढाऊ विमाने आणि सुमारे 150 प्रचंड हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण संपादन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय झाला.
Today, the Defence Ministry has cleared the proposal for the acquisition of 97 LCA mark 1A fighter jets for the Indian Air Force at a cost of around Rs 65,000 crores. Proposal for buying 156 LCH Prachand choppers have also been approved by the Defence Acquisition Council along…
— ANI (@ANI) November 30, 2023
आज संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलासाठी सुमारे 65,000 कोटी रुपये खर्चून 97 LCA मार्क 1A लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय, 156 एलसीएच प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी आणि 84 Su-30MKI लढाऊ विमानांच्या अपग्रेड योजनेलाही संरक्षण अधिग्रहण परिषदेने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावावर सूमारे 1.6 लाख कोटी रुपय खर्च अपेक्षित आहे.